Jalgaon : PFI च्या संशयितावर NIA-ATS पथकाची साखरझोपेतच झडप

Abdul Haddi Abdul Rauf Momin
Abdul Haddi Abdul Rauf Mominesakal
Updated on

जळगाव : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) देशभरातील संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी छापेमारी करत शंभरावर कार्यकर्त्यांना अटक केली आहे. जळगाव शहरात भल्या पहाटे एटीएसच्या अकोला युनिटमधील अधिकाऱ्यांनी मेहरूणमधून एकाला ताब्यात घेतले. संशयित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)चा खजिनदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुरुवारी (ता. २२) पहाटे साडेतीनच्या सुमारास या संशयिताला ताब्यात घेत अवघ्या तासाभरात तपासयंत्रणेचे अधिकारी पथक आले, त्या वेगाने रवाना झाले. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय ३२, रा. रेहमान गंज वरुण अपार्टमेंट, जालना) असे संशयिताचे नाव आहे. ( PFI suspect nabbed by NIA ATS team Jalgaon Crime News)

Abdul Haddi Abdul Rauf Momin
Pune Road | पुण्यातल्या रस्त्यांवर पसरलंय खड्ड्यांच साम्राज्य

दहशतवादविरोधी पथकाच्या अकोला युनिटचे उपनिरीक्षक गौरव सराग, अनिल देवरनकर, सचिन चव्हाण, योगेश सतरकर आदींचे पथक तीन वाहनांनी पहाटे तीनला जळगावात दाखल झाले. एमआयडीसी पोलिस ठाण्याची मदत घेत पहाटे साडेतीनला मेहरूणमधील दत्तनगरातील धार्मिकस्थळावर धडकले. गाढ झोपेत असलेल्या तिघांना पथकाने ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. तिघांची चौकशी झाल्यानंतर पैकी दोघांना सोडून देण्यात आले. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन याला अटक केल्याचे स्थानिक पोलिसांनी माहिती देताना सांगितले.

पथक औरंगाबादच्या दिशेने

ताब्यात घेतलेली व्यक्ती जालना येथील मूळ रहिवासी असून, तो काही दिवसांपासून जळगावच्या मेहरूण परिसरात वास्तव्यास होता, अशी माहिती मिळाली. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन असे त्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. २१/२०२२ कलम १२१-A, १५३-A, १२०-ब, १०९ भा.दं.वि. सहकलम १३ (१) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे. एवढेच नव्हे तर ही व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. अटकेतील संशयिताला घेऊन अकोला एटीएसचे पथक औरंगाबादच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

Abdul Haddi Abdul Rauf Momin
Akola Agriculture Loss : पाच एकर क्षेत्रावर फिरविला ट्रॅक्टर

एटीएस महाराष्ट्रचे मोठ्या प्रमाणात छापे

पहाटेच्या कारवाईत एटीएस महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे विविध कलमांतर्गत आणि यूएपीए कलम १३ (१) (ब)मध्ये समाजात वैर वाढविणाऱ्या बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

त्याला कोणीच ओळखे ना!

अटकेतील संशयित अब्दुल हादी अब्दुल रौफ हा मूळ जालन्यातील नेर सेवलीतील रहिवासी असून, तो संघटनेच्या जालन्यातील सोशल मीडियाचे काम पाहतो. मात्र, तो जळगावात कसा आला याबाबत अद्याप कुठलीच ठोस माहिती उपलब्ध नसून पहाटे धार्मिक स्थळ उघडण्याच्या वेळीच तो अलगद येऊन झोपला असावा असा अंदाज व्यक्त होत असून, प्रार्थनास्थळावरील विश्वस्तांनाही याबाबत फारशी माहिती नसल्याचे आढळून आले.

तेरा राज्यांमध्ये कारवाई

महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि आसामसह १३ राज्यांत दहशतवादी कारवायांसाठी फॉरेन फंडिंगच्या संशयावरून

राष्ट्रीय तपास यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय, दहशतवादविराधी पथकाने संयुक्तरीत्या त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी एका निर्धारित वेळेत अटकसत्र राबविले.

शंभराहून अधिक अटकेत

आतापर्यंत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १०० हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. सर्वाधिक अटक केरळ (२२), त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक (प्रत्येकी २०), तमिळनाडू (१०), आसाम (९), उत्तर प्रदेश (९), आंध्र प्रदेश (५) आणि मध्य प्रदेश (४)मध्ये अटक करण्यात आली. महाराष्ट्रात पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगाव, नाशिकसह इतर ठिकाणी छापेमारी केली आहे.

Abdul Haddi Abdul Rauf Momin
Organ Donation 47 वर्षीय महिलेने दिले 5 जणांना जीवदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com