Plastic Ban Campaign : चाळीसगावला आजपासून प्लास्टिकबंदी मोहीम

Chh. plastic ban
Chh. plastic bansakal
Updated on

Plastic Ban Campaign : शहरातील दुकानदारांना वारंवार सूचना देऊन दंडात्मक कारवाया करूनही अद्यापपर्यंत प्लास्टिकच्या कॅरिबॅग्ज व इतर बंदी असलेल्या वस्तूंची विक्री केली जात आहे. या विरोधात येथील नगरपालिकेने प्लास्टिकंबदी मोहीम तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

शुक्रवारपासून (ता.२०) जे दुकानदार बंदी असलेल्या प्लास्टिकच्या कॅरिबॅग व इतर साहित्य विकताना आढळून येतील, त्यांच्याविरोधात नियमानुसार कारवाया केल्या जातील, असे पालिकेच्या प्लास्टिकबंदी पथकाचे प्रमुख दिनेश जाधव यांनी सांगितले. (plastic ban campaign from today in Chalisgaon jalgaon news)

राज्यात २१ ऑगस्टपासून प्लास्टिक बंदीची मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. प्रशासकीय पातळीवर प्लास्टिक विरोधी मोहिमा राबवल्या जात असल्या तरी या मोहिमांचे यश प्रत्यक्षात अनुभवास येत नाही.

येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र प्लास्टिक विरोधी पथक नियुक्त केले आहे. या पथकाकडून यापूर्वी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत. मात्र, तरीही अनेक जण बंदी असलेल्या प्लास्टिकच्या कॅरिबॅग व इतर साहित्य सर्रास विकत आहेत.

Chh. plastic ban
Jalgaon Election: प्रमुख पक्षांसह MIM च्या हालचाली गतिमान; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची पूर्वतयारी

या विरोधात शुक्रवारपासून (ता. २०) कडक मोहीम राबविली जाणार असल्याने गुरुवारी (ता. १९) पथकाने शहरातील बाबूभाई प्लास्टिक, धनश्री प्लास्टिक, गायत्री प्लास्टिक, मनुमाता प्लास्टिक, बालाजी प्लास्टिक, आशापुरी प्लास्टिक, जयभोले प्लास्टिक आदी विक्रेत्यांना सूचित करून बंदी असलेल्या प्लास्टिकच्या कॅरिबॅग व इतर साहित्य विक्री न करण्याची सूचना केली.

ज्या विक्रेते प्लास्टिक कॅरिबॅग विकताना आढळून येतील, त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा या सर्वांना दिला असल्याचे जाधव यांनी ‘सकाळ’ला सांगितले. यावेळी पथकातील प्रेमसिंग राजपूत, सुमीत सोनवणे, नितीन सूर्यवंशी, मयूर पगारे आदी उपस्थित होते.

Chh. plastic ban
Banana Crop Insurance : विमा कंपनीकडे 196 कोटी वर्ग झाले नसल्याची कृषिमंत्र्यांची कबुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nanded
Circular Economy Architecture: Introducing the E-Incentive 'Plastic Bank' Framework in Haveli
Muslim Gorakshak Dal in Miraj
Pan Masala Plastic Ban
Marathi News Esakal
www.esakal.com