Jalgaon News : पोलिस दल अलर्ट मोडवर; कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द

सोमवारी जिल्‍हाभरात मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दल अलर्ट मोडवर आले असून, संपूर्ण पोलिस दल तैनात राहणार आहे.
police (file photo)
police (file photo)esakal

Jalgaon News : अयोध्येत सोमवारी (ता. २२) प्रभू श्रीराम यांची विधिवत स्थापना करण्यात येत आहे. देशभर श्रीराम मंदिर स्थापना दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात येत असून, जळगावातही गेल्या दोन दिवसांपासून उत्साहाला उधाण आले आहे.

सोमवारी जिल्‍हाभरात मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दल अलर्ट मोडवर आले असून, संपूर्ण पोलिस दल तैनात राहणार आहे. (police force put on alert mode to maintain law and order and entire police force deployed jalgaon news)

अयोध्या येथे श्रीराम मंदिराची स्थापना होऊन सोमवारी (ता. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. अयोध्येचा राममंदिर स्थापना दिन देशभर उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे.

नागरी वस्त्यांना रंगीत पताकांसह विद्युत रोषणाईद्वारे सजविण्यात आले असून, जळगाव जिल्‍ह्यात आणि शहरात मिरवणुकांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले आहे. दिवसा विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे.

जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांचा आढावा घेतला असून, शहरातील नागरीवस्त्या आणि मुख्य बाजारपेठांच्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमांची माहिती घेतली.

सुट्या रद्द

पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून, अत्यावश्यक वैद्यकीय रजा वगळता दीर्घ रजेवर असलेल्यांना परत बोलाविण्यात आले आहे. जळगाव शहरात दोन मिरवणुका काढण्यात येणार असून, ठिकठिकाणी श्रीराम नामाचा गजर करण्यात येणार आहे. सर्वच धार्मिक स्थळांवर, मंदिरांवर धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

police (file photo)
Jalgaon News : बुंदी वाटपातून आज आनंदोत्सव; 6 क्विंटल बुंदी, जळगावला 2100 लाडू वाटप

...असा बंदोबस्त तैनातीवर

- पोलिस अधीक्षक - एक

- अप्पर पोलिस अधीक्षक - दोन

- डीवायएसपी - सहा

- स्ट्रायकिंग फोर्स - पाच

- राखीव पोलिस दल - पाच

- मुख्यालयातील कर्मचारी - १०० (२५ महिला)

- गृहरक्षक दल - ६००+१५० (पुरुष, महिला)

- पोलिस ठाण्यांचे प्रभारी, दुय्यम अधिकारी

तब्बल ८२ मिरवणुका

जळगाव जिल्ह्यात एकूण ८२ मिरवणुका निघणार असून त्यात मिरवणूक ३३, शोभायात्रा १४, पालखी सहा, दिंडी २६, कलश यात्रा ३, मूर्ती प्रतीमा पूजन ३, मोटरसायकल रॅली ५, इतर कार्यक्रमात महाआरती ३९, भजन कीर्तन १९, महाप्रसाद ३१, लाईव्ह प्रक्षेपण ७, संगीत रामायण २, प्रभातफेरी २ असे आहेत.

police (file photo)
Jalgaon News : कारसेवक खडसेंनी जागविल्या नव्वदीतील स्मृती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com