
स्टेटबँकेच्या आवारात मुलीला शोधून थकलेली तिची आई, उदास चेहऱ्याने डोक्याला हात लावून बसलेली हेाती.
जळगाव : शहरातील स्टेडियम परिसर ते मध्यवर्ती बसस्थानकदरम्यान रस्त्याने रडत फिरणाऱ्या चिमुरडी पोलिस कर्मचाऱ्याला दिसली. पोलिस कर्मचारी यांनी मुलीला थांबवून चौकशी करत मदतीचा हात पुढे केला. आईसोबत बँकेत आलेल्या या बालिकेची व आईची गर्दीमुळे ताटातूट होऊन बालिका रडून रडून थकली होती.
आवश्य वाचा- कस होणार जळगावच! आधीच खड्यांनी नागरीक त्रस्त, त्यात रस्त्याच्या कामास ठेकेदाराची ना
आईशी ताटातूट झाल्यानंतर रडून रडून थकलेल्या चिमुरडीवर पोलिस कर्मचारी प्रमोद पाटील यांची नजर पडली. त्यांनी तिला तत्काळ दुचाकीवर बसवून पोलिस ठाण्यात आणले. तिच्या आवडीचे बिस्कीट, पिण्यास पाणी दिल्यानंतर चिमुरडी शांत झाली.
आणि आईचा सुरू झाला शोध
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात साध्या वेशातील महिला कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली असता, दीप्ती देवानंद मेढे (वय ५) असे तिचे नाव असल्याचे समजले. त्यानंतर श्री. पाटील व प्रवीण भोसले परत तिला दुचाकीवर घेऊन आईच्या शोधात निघाले.
आवर्जून वाचा- दुश्मनी काढण्याठी कंबरेला पिस्तूल, खिशात काडतूस; पण गुन्हा करण्यापूर्वीच गेले कोठडीत
मायलेकीची भेट
बालिकेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आईचा शोध घेत पोलिस नवीन बसस्थानक ते थेट कोर्ट चौकापर्यंत चौकशी करत होते. नंतर स्टेटबँकेच्या आवारात मुलीला शोधून थकलेली तिची आई, उदास चेहऱ्याने डोक्याला हात लावून बसलेली हेाती. तिला बघताच दीप्तीने ‘आऽऽई’ म्हणून हाक मारताच, ताड्कन उभे राहून आईने मुलीला कवेत घेत मुक्यांचा वर्षाव करत लाड केले. हे चित्र बघून परिसरातील नागरिकही काही काळ सद्गदीत झाले होते.
संपादन- भूषण श्रीखंडे