Jalgaon Police Transfer : गुन्हे आढावा बैठकीत गाजला बदल्यांचा मुद्दा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे एसपींचे आदेश

Police
Police sakal

Jalgaon Police Transfer : जिल्‍हा पोलिस दलातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. तीन ठिकाणच्या पसंतीक्रमाचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिला होता.

त्यानुसार मुलाखतीही झाल्या. कर्मचाऱ्याने मागितले एक, त्याला मुलाखतीत मिळाले दुसरे आणि गॅझेटमध्ये तिसऱ्या ठिकाणी बदली झाली.

या तक्रारींचा मुद्दा गुन्हे आढावा बैठकीत बराच तापला. अखेर पोलिस अधीक्षकांनी बदलीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले. (police transfer SP orders inquiry of senior officers and employees jalgaon news)

जवळपास सहाशे कर्मचाऱ्यांच्या बदलीचे गॅझेट जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले असून, त्यात सहाय्यक फैाजदार ७१, शिपाई १८४, हवालदार १४८, पोलिस नाईक १२०, वाहनचालक ५२ यांच्याव्यतिरिक्त विनंती बदल्यांचा तपशील आहे.

बहुतांश कर्मचाऱ्यांची मनाप्रमाणे बदली न मिळाल्याची नेहमीच ओरड असते. यंदा हे प्रकार जास्तच झाल्याने बदल्यांच्या तक्रारी थेट पोलिस महानिरीक्षकांसह लोकप्रतिनिधीपर्यंत पोचल्या. गुन्हे आढावा बैठकीतही त्याचा उहापोह झाला.

बदली गॅझेट प्रसिद्ध होऊन पावणे दोन महिने उलटले. नाइलाजाने काही हजर झाले. त्यांची तक्रार मात्र कायम आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police
Jalgaon Crime News : शैक्षणिक संस्थेतील कामकाजावरून वाद; मुलाकडून वडिलांना मारण्याची धमकी

काहींनी एसपींना भेटण्याची परवानगी मागितली आहे. बदल्या होऊनही कर्मचारी हजर होत नसल्याची ओरड गुन्हे आढावा बैठकीत झाली.

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या प्रकरणाची दखल घेत बदल्या आदेशात फेरफार झाल्याप्रकरणी गॅझेटची जबाबदारी असलेले डीवायएसपी, रावसाहेब रावते (क्लर्क), तत्कालीन रिडर आणि बदली गॅझेटची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले.

दरम्यान, बदल्यांच्या तक्रारी होऊ लागल्याने पोलिस ठाण्यात कलेक्शनवर असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस निरीक्षक सोडत नसल्याचा बहाणा आजवर होता. मात्र, तक्रारीच वाढल्याने आपल्याला मुदतवाढ मिळावी, म्हणून काहींनी प्रयत्न चालविला आहे. साहेबांचा जवळचा असलेल्यांसाठी दस्तुरखुद्द पोलिस निरीक्षकच प्रयत्न करीत असल्याचेही बोलले जात आहे.

Police
Jalgaon News : रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करणार; महापौर, उपहापौरांचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com