Jalgaon : धानोऱ्यातील पोलिस-ग्रामस्थांची दंगल निवळली

A police-villager riot broke out in this square.
A police-villager riot broke out in this square.esakal

जळगाव : धानोरा (ता. चोपडा) येथील हनुमान चौकात विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने पोलिसांविरुद्ध ग्रामस्थ अशी दंगल उसळली होती. वाजंत्री बंद करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात पोलिसांवर दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली.

रात्री उशिरा अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी गावात दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर गणेश विसर्जन पहाटे पाचपर्यंत पूर्ववत करण्यात आले. (police villagers riot in Dhanora has ended Jalgaon Latest Marathi News)

चोपडा तालुक्यातील धानोरा गावात काल रात्री सव्वादहा वाजताच हनुमान चौकात सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी ढोल-ताशे बंद करुन ग्रामस्थ आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांना चौकात एकत्र करून निघून जाण्यासाठी धमकावले.

ग्रामस्थ ऐकत नाही म्हटल्यावर पोलिसांनी गणेशमंडळ कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केल्याच्या संतापात पोलिसांवर ग्रामस्थांनी तुफान दगडफेक करत सळो की, पळो करुन सोडले. यात १५ ते २० ग्रामस्थ जखमी झाले असून भिकन महाजन (माळी) हा लाठीचार्ज मध्ये गंभीररीत्या जखमी झाला आहे.

A police-villager riot broke out in this square.
Crime Update : अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; गुन्हा दाखल

हिंदु-मुस्लीम एकत्र

जातीय संवेदनशील गाव म्हणून पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जात असले तरी, पोलिसांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर गावातील गणेशमंडळ कार्यकर्ते ग्रामस्थ पोलिसांविरुद्ध उठे ठाकले. हिंदू-मुस्लीम दोन्ही समुदाय यावेळी पहाटे उशिरापर्यंत गावचौकात ठिय्या मांडून पोलिसांच्या कारवाईचा विरोध करत होते.

"धानोरा येथील प्रकार कसा घडला, कोणाच्या चुकीमुळे घडला याबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरु आहे. अद्याप एकाही गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. संपूर्ण निष्पक्ष चौकशी करण्यात येत आहे. ग्रामस्थांशी चर्चा झालेली असून धानोरा गाव पूर्णतः शांत आहे. बंदोबस्त लावण्यात आला आहे." - डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा पोलिस अधीक्षक

A police-villager riot broke out in this square.
...अन् मुंबईला जाणे पडले चांगलेच महागात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com