esakal | मंत्री गुलाबराव पाटील..स्वःताची पाठ थोपटून घेतायं !
sakal

बोलून बातमी शोधा

 gulabrao patil-Suresh Bhole)

मंत्री गुलाबराव पाटील..स्वःताची पाठ थोपटून घेतायं !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) शिवसेना विरुद्ध भाजप वाद आता आणखी वाढला आहे. भाजप (bjp) आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole) यांनी थेट शिवसेना (shiv sena) नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांच्यावर हल्ला करीत नियोजन निधी प्रत्येक जिल्ह्यात खर्च होत असतो, तुम्ही का पाठ थोपटून घेत आहात, असा टोला लगावला आहे. (bjp mla suresh bhole dpdc fund allegations shiv sena minister gulabrao patil)

हेही वाचा: अपर जिल्हाधिकारी उतरले नदी पात्रात..वाळू उत्खननाची केली पाहणी !

जळगाव महापालिकेत भाजपकडून शिवसेनेने सत्ता मिळविल्यानंतर दोन्ही पक्षात जोरदार शाब्दिक हल्ले होत आहेत. शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते व तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करीत त्यांनी जळगावसाठी काहीही केले नसल्याची टीका केली होती. आपण जिल्हा नियोजन विभागातून (District Planning Department) महापालिकेस ६० कोटी रुपये मंजूर केले असल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा: कोरोनाबाधीत गर्भवती मातांची यशस्वी शस्त्रक्रिया; आणि बाळ ही सुखरूप !

शासनस्तरावर निधी खर्च होतो

भाजप आमदार सुरेश भोळे यांनी उत्तर देत म्हटले आहे, की भाजपचे पालकमंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील असताना त्यांनीही जिल्हा नियोजन समितीतून विकास निधी मंजूर केला. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा वार्षिक योजना (डी.पी.डी.सी.) जळगाव जिल्हा अंतर्गत २०१६-१७ वितरित तरतुदीशी खर्चाची एकूण टक्केवारी ९९.०४ टक्के, २०१७-१८ अंतर्गत ९९.८७ टक्के, २०१८-१९ अंतर्गत ९९.६६ टक्के इतका निधी भाजपचे माजी पालकमंत्री यांच्या कार्यकाळात खर्च झालेला आहे. या निधीचे संबंधित विभागाचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या नियंत्रणद्वारे नियोजन होत असते. तसेच शासनस्तरावर प्रत्येक जिल्ह्यात याच प्रकारे निधी खर्च होत असतो. असे असताना गुलाबराव पाटील यांनी डी.पी.डी.सी. अंतर्गत विकासकामांचे श्रेय घेत स्वतःची पाठ थोपटली आहे. त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, असा मार्मिक टोला आमदार भोळे यांनी लगावला.

(bjp mla suresh bhole dpdc fund allegations shiv sena minister gulabrao patil)

loading image