भाजप खासदाराला ‘राष्ट्रवादी’मय शुभेच्छा ! अनेकांच्या भुवया वर

अभीष्टचिंतन करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि या सर्व पोस्टमध्ये लक्षवेधी ठरल्या
भाजप खासदाराला ‘राष्ट्रवादी’मय शुभेच्छा ! अनेकांच्या भुवया वर


जळगाव : राज्यातील आघाडी सरकार (Lead government) व विरोधी भाजप (BJP) त सध्या विस्तवही जात नसताना भाजप खासदारांच्या वाढदिवस शुभेच्छाफलकांवर राष्ट्रवादीतील नेत्यांची (NCP leader) छायाचित्रे लागल्याने राजकीय चर्चेस उधाण आले आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी रावेरच्या खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांचे अभीष्टचिंतन करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्याने आश्‍चर्यही व्यक्त होतेय. ( BJP MP Raksha Khadse birtday Good luck NCP leader Banner )

भाजप खासदाराला ‘राष्ट्रवादी’मय शुभेच्छा ! अनेकांच्या भुवया वर
नाव त्‍याचे पारदर्शी..त्‍यात किर्तनकाराचा मुलगा; पण त्‍याचा कारनामा मोठाच


भाजपच्या रावेर येथील खासदार रक्षा खडसे यांचा गुरुवारी वाढदिवस झाला. त्यांचे अभीष्टचिंतन करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या सर्व पोस्टमध्ये लक्षवेधी ठरल्या त्या एकनाथ खडसे व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे-खेवलकरांनी (Ad Rohini Khadse) दिलेल्या शुभेच्छांच्या पोस्ट.


शुभेच्छांनी भुवया उंच
श्रीमती रक्षा रावेरच्या भाजपच्या खासदार असल्या तरी त्या खडसेंच्या स्नुषा आहेत. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी यांनीही सोबत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. रक्षा खडसे यांनी मात्र भाजपत राहणे पसंत केले. एकाच कुटुंबात दोन पक्षांचे लोक, ही राज्याला अथवा देशासाठी नवीन बाब नाही. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत व स्नुषा भाजप याला काही राजकीय आचारसंहिता लागू नाही. आपल्याच कुटुंबातील पण, अन्य पक्षातील सदस्याला शुभेच्छा देणेही स्वाभाविक. एरवी भिन्न पक्षात असतानाही अनेक नेत्यांच्या मैत्री व संबंधांचे आजही दाखले दिले जातात.


भाजप खासदाराला ‘राष्ट्रवादी’मय शुभेच्छा ! अनेकांच्या भुवया वर
साल वाढवूनही सालदार गडी मिळेना; मध्यप्रदेशातून आणला जातोय मजूर

...पण नेत्यांचे फोटो का?
त्यामुळे भिन्न पक्षातील लोकप्रतिनिधीला शुभेच्छा देण्यालाही कुठली आचारसंहिता आडवी येण्याची गरज नाही. मात्र, रक्षा यांना शुभेच्छा देताना खडसेंनी नसतीलही पण त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हासह खडसेंचा व शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, ॲड. रवींद्र पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे आवर्जून वापरली आहेत.

( BJP MP Raksha Khadse birtday Good luck NCP leader Banner )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com