भडगाव तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 

सुधाकर पाटील
Thursday, 21 January 2021

या प्रवेशामुळे शिवसेनेची दोन्ही तालुक्यांत ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सागितले.  

भडगाव : येथील माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. त्यांच्याशिवाय डॉ. विशाल पाटील यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. तर प्रवीण ब्राह्मणे यांनीही शिवबंधन बांधले. मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील उपस्थित होते. 

आवश्य वाचा- कार्यकर्त्यांचे कौतुक करावे की सांत्वन; राजकीय पुढाऱ्यांसमोर पेच 

राष्ट्रवादीला धक्का 
आगामी काळात भडगाव नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रशांत पवार यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश शिवसेनेला फायदेशीर ठरणारा आहे, तर राष्ट्रवादीला धक्का देणारा आहे. सध्या पंचायत समितीत भाजपचे दोन सदस्य आहेत. त्यात पंचायत समिती सदस्या डॉ. अर्चना पाटील यांचे पती डॉ. विशाल पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना शिवसेनेकडून पंचायत समितीच्या सभापतिपदाची संधी मिळणार आहे. पाचोरा येथील श्री. ब्राह्मणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पाचोरा शहरात शिवसेनेला बळ मिळणार आहे. 

वाचा- जळगावातील वादग्रस्त अतिक्रमण मनपाने पहाटे काढले; आणि गणेश कॅालनी रस्त्याने घेतला मोकळा श्वास
 

दरम्यान, या प्रवेशामुळे शिवसेनेची दोन्ही तालुक्यांत ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सागितले.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi news jalgaon bjp ncp supporter join shiv sena