Jalgaon Political News : राजकीय ‘बॅनरबाजी’वर राजकारण; BJPने फलक उतरविले; NCPने पुन्हा लावले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The political banner taken down after the statement of BJP Yuva Morcha

Jalgaon Political News : राजकीय ‘बॅनरबाजी’वर राजकारण; BJPने फलक उतरविले; NCPने पुन्हा लावले!

अमळनेर (जि. जळगाव) : शहरातील प्रताप महाविद्यालयात आमदार चषकाचे आयोजन केले असल्याने प्रवेशद्वारावर पक्षाचे व नेत्यांचे फलक लावले आहेत. या फलकांवर आक्षेप घेत भाजप युवा मोर्चाने शुक्रवारी (ता. १६) दुपारी फलक उतरविले तर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने पुन्हा फलक जागेवर लावले. (Politics on political banners BJP drops placards NCP replanted Jalgaon Political News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : गणेशनगर येथील खडीक्रेशर सील; विनापरवाना उत्खननावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा उभा केलेला तोच फलक.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा उभा केलेला तोच फलक.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबरपासून शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावर आमदार चषकाच्या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांनी भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व नेत्यांच्या फोटोचे भव्य फलक लावण्यात आले आहेत.

यालाच आक्षेप घेत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने प्राचार्यांना निवेदन देत महाविद्यालयाच्या आवारातील फलक हटवायची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी युवा मोर्चाचे शिवाजी राजपूत, राहुल चौधरी, सागर धनगर, निनाद जोशी, कल्पेश पाटील, कमलेश कुलकर्णी व इतर कार्यकर्ते हजर होते. या सर्व घडामोडीत फलक हटविण्यात आले.

फलक हटविल्याची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांना समजताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सनी गायकवाड, कृष्णा बोरसे, अनिरुद्ध शिसोदे तसेच इतर कार्यकर्त्यांनी काढलेले फलक पुन्हा जागेवर लावले. या निमित्ताने मात्र भाजप आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. कॉलेज प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: Nashik News : सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ वारकऱ्यांची दिंडी!