पोलिस महानिरीक्षकांकडून लाचखोरांमुळे वरिष्ठांवर लवकरचं होणार कारवाई ?

रईस शेख
Wednesday, 30 December 2020

पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी पाचही जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेतली.

जळगाव ः लाचखोरीत महसुलाच्या बरोबरीला पोलिसदलाची कदमताल सुरू आहे. आता वरिष्ठांनी लाचखोरांचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आजवर पोलिसदलात लाच घेणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन निलंबन करण्यात येत होते. आता मात्र कुठल्याही पोलिस ठाण्यावर लाचलुचपत विभागाचा छापा पडल्यावर अगोदर त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर निलंबनाचा बडगा उगारला जाणार आहे. राज्यात इतरत्र हाच पायंडा असून, जळगाव जिल्‍हा मात्र त्याला अपवाद होता. पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन पाचही जिल्ह्यां‍यातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे. 

आवश्य वाचा- गडचिरोलीत सेवा बजाविणार्‍या नंदूरबारच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

शिस्तीचे खाते असल्याने लाचखोरीच्या गुन्ह्यात इतर कुठल्याही शासकीय विभागापेक्षा पोलिस दलात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अधिक निर्बंध व आचारसंहिता आहे. असे असतानाही पोलिस कर्मचारी अधिकारी लाचखोरीत अव्वल असल्याचे वारंवार निदर्शनास येत असल्याने राज्याचे पोलिस महासंचालकांनी नुकतेच राज्यातील सर्व महानिरीक्षकांना याबाबत कठोर निर्देश जारी केले आहेत. याची दखल घेत पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी पाचही जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेतली. लाचखोरी आढळल्यास उपविभागीय अधिकाऱ्यालाही जबाबदार म्हणून कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्टपणे सूचना करण्यात आल्या आहेत. 

 

आवर्जून वाचा- दुर्दैवी घटना : जवानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावकरी तयारीत; एक फोन आला, दुःखाचा डोंगर कोसळला

 

पोलिसदलातच खळबळ 
पोलिस महासंचालकांनी शिर्डी येथील पेालिस ठाण्याच्या भेटीप्रसंगी लाचखोरीच्या प्रकरणात प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्याच धर्तीवर पोलिस महानिरीक्षकांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कारवाईचे आदेशच दिल्याने जिल्‍हा पोलिस दलातील ३५ पोलिस ठाण्यांतील प्रभारींसह डीवायएसपींमध्ये खळबळ उडाली आहे. 

वाचा- रेल्वेचे तिकीट चेक करण्यासाठी मागितले; चक्क! टिसीला डांबून प्रवाश्यांकडून मारहाण

जळगाव जिल्‍हा अपवाद ठरतो 
महाराष्ट्र पोलिसदलात मुंबई, नाशिक, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये पोलिस कर्मचारी- दुय्यम अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई झाल्यावर तेथील प्रभारी अधीकाऱ्याची उचलबांगडी करण्यात येते. गेल्या तीन महिन्यांत मालेगाव, ठाणे, नाशिक, नगर अशा विविध पाच पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात जमा व्हावे लागले. मात्र, जळगाव शहरात नुकतीच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप हजारे यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pollice marathi news jalgaon inspector general of police bribe officer action