धुळीमुळे जळगावचे झाले ‘धुळगाव’;प्रदूषणात दुपटीने वाढ

धुळीमुळे जळगावचे झाले ‘धुळगाव’;प्रदूषणात दुपटीने वाढ
Updated on

जळगाव : ‘अमृत’ पाणीपुरवठा व भुयारी गटारांच्या योजनेमुळे खोदलेले रस्ते, शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वर्षभरात शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, प्रदूषणात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. 

शहरातील कोणत्याही रस्त्याच्या कडेला दोन-चार तासांसाठी वाहन उभे केले, तरी त्यावर धुळीचा अक्षरश: थर साचलेला असतो. कमी-अधिक प्रमाणात शहरातील सर्वच रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. तीन वर्षांपासून रेंगाळलेले अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम आणि त्यात वर्षभरापासून सुरू झालेल्या भुयारी गटारांच्या कामाने भर टाकत संपूर्ण शहरात रस्ते नावाचा घटकच अस्तित्वात ठेवलेला नाही. 

‘धुळगावा’ची उपमा 
या कामांसाठी म्हणून रस्ते खोदलेले असताना, त्यांची योग्य व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशी डागडुजीही झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात धुळीचे मोठे साम्राज्य पसरल्याचे दिसते. सोशल मीडियावर रस्ते, त्यातील खड्डे व त्यामुळे उडणाऱ्या धुळीबाबत शहराची ‘इज्जत’ घेणारे मेसेजेस सध्या जोरात आहेत. त्यातूनच जळगावचे नामकरण ‘धुळगाव’ करण्यात आले आहे. 

प्रदूषण वाढले दुपटीने 
वर्षभरातील वायुप्रदूषणाचा आढावा घेतला असता, ते प्रचंड वाढल्याच्या नोंदी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहेत. हवेतील प्रदूषण नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फरडाय ऑक्साइड व धूलिकण (आरएसपीएम) या घटकांमध्ये मोजले जाते. वाहनांची वर्दळ व विस्तारलेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे नायट्रोजन व सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. आपल्या शहरात तुलनेने हे प्रदूषण नगण्य आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत, वर्षात धुळीचे प्रदूषण खूप वाढले आहे. 

‘किलोभर मळ अंगावर...’ 
शहरातील धुळीची अवस्था अशी आहे, की शहरातील कोणत्याही भागातून काही वेळ पायी फिरलो अथवा वाहनावर ‘रपेट’ मारली, तरी किलोभर मळ अंगावर जमा होईल, असा अनुभव येतोय. यात काहीशी अतिशयोक्ती असली, तरी दिवसभरात बाहेर फिरल्यानंतर आपला चेहरा, केस आणि कपड्यांची अवस्था बघितली तरी किती भयावह स्थिती आहे, याची कल्पना येते. 
 

असे वाढले धुळीचे प्रदूषण 
शहरात बी. जे. मार्केट, गिरणा टाकी परिसर व एमआयडीसी अशा तीन ठिकाणी हवेतील प्रदूषणाच्या तीन घटकांच्या नोंदी घेतल्या जातात. या तिन्ही ठिकाणांपैकी बी. जे. मार्केट व गिरणा टाकी परिसरातील धूळ प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसते. 

प्रकार ------- -----राष्ट्रीय मानक--- सरासरी नोंद 
धूलिकण (rspm)---४०------------६० ते ६५ 
(२.५ मायक्रॉनपेक्षा 
कमी) 
धूलिकण (spm)------६०----------८०-१०० 
(१० मायक्रॉनपेक्षा 
कमी) ------ 

 
प्रदूषित १७ शहरांत जळगाव 
केंद्र सरकारने नुकतीच देशभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश असून, धुळीच्या वाढत्या प्रमाणामुळे ‘धुळगाव’ झालेल्या जळगाव शहराचाही यात समावेश आहे..  

 
तर १७ शहरांत जळगाव 
केंद्र सरकारने नुकतीच देशभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश असून, धुळीच्या वाढत्या प्रमाणामुळे ‘धुळगाव’ झालेल्या जळगाव शहराचाही यात समावेश आहे..  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com