

जळगाव : कोरोनाची (Corona) चौथी लाट (Fourth Wave) जून अखेरीस येण्याची शक्यता राज्याच्या आरोग्य विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात याच महिन्यात दहा कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे जळगाव जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरला, दोन्ही लसींचे डोस घेऊन पात्र नागरिकांनी बूस्टर डोसही घेतला तर तिसऱ्या लाटेप्रमाणेच चौथी लाट सौम्य राहील, मात्र नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याच्या सूचना जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या कौन्सिल बैठकीत डॉक्टरांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत संभाव्य लाटेच्या दृष्टीने औषध साठ्याची उपलब्धता, ऑक्सिजन प्लांटची कामे या याबाबींची माहिती घेण्यात आली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.
लसीकरणाकडे पाठ धोकादायक
कोरोनाची तिसरी लाट आली. मात्र त्यापूर्वीच अनेकांनी दोन्ही डोस घेतल्याने त्यांना संसर्गाची बाधा झाली नाही. ज्यांनी डोस घेतला नव्हता त्यांना मात्र रुग्णालयात दाखल व्हावेच लागले. या लाटेनंतर सर्वांनीच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे पाठ फिरविली. लसीचे दोन्ही डोस, बूस्टर डोस घेणे आवश्यकच आहे. अन्यथा कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सर्वांनीच लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे डॉ. रामानंद यांनी सांगितले.
''सर्वांनी दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे, तिसरा बूस्टर घेणे, मास्क वापरणे, गर्दीत न जाणे, स्वयंशिस्त पाळणे याबाबींचा अवलंब केल्यास चौथ्या लाटेत अनेकांना संसर्ग होणार नाही''. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.