जळगाव शहरात विजेचा लपंडाव; महावितरण कार्यालयातील दूरध्वनी व्यस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Power outage in Jalgaon city

जळगाव शहरात विजेचा लपंडाव; महावितरण कार्यालयातील दूरध्वनी व्यस्त

जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनीनगर, सावखेडा, खंडेरावनगर, महाबळ कॉलनीसह शहरात विविध ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात रात्री दहानंतर दर १० मिनिटांत वीज गूल होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा चिमुकल्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (Power outage in Jalgaon city)

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना विजेच्या लपंडावाने अधिकच बेहाल करून सोडले आहे. रात्री डासांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रोज रात्री दहाला वीजपुरवठा खंडित होतो. नंतर पाच- दहा मिनिटांत वीजपुरवठा सुरळीत होतो. पुन्हा रात्री अकराला वीजपुरवठा खंडित होतो. रात्री साडेबाराला वीजपुरवठा सुरळीत होतो. पुन्हा रात्री एकला वीज गेली, तर मध्यरात्री अडीचला येते. पुन्हा पहाटे पाचला वीज गेली, तर सकाळी सहाला येते. अशाप्रकारे सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
महाबळ कॉलनी, सोनीनगर, खंडेरावनगरातील नागरिक नियमित वीजबिल भरूनही त्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. वीजपुरवठा खंडित झाला, की नागरिकांचे फोन खणखणतात. मात्र, फोन व्यस्त असतो. मात्र, वीजपुरवठा सुरू झाला, की तत्काल फोन उचलला जातो, अशाप्रकारे नागरिकांशी हा लपंडावाचा खेळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा: जळगाव : अपार्टमेंटच्या पार्किंगमधील वाहने पेटविली

कार्यालयातील दूरध्वनी व्यस्त, अधिकारी मस्त

नागरिक विजेबाबत विचारपूस करण्यासाठी पिंप्राळा महावितरणच्या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क करतात. मात्र, दूरध्वनी व्यस्तच असतो. रात्रीचे कर्मचारी जाणून बुजून दूरध्वनी बाजूला उचलून ठेऊन देत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: आईच्या शेतावरून पेटली भावंडात ‘भाऊबंदकी’; नातवाने गमावले प्राण

Web Title: Power Outage In Jalgaon City News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonpower cut
go to top