PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या वंचित लाभार्थ्यांसाठी 90 कोटी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Awas Yojana

PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या वंचित लाभार्थ्यांसाठी 90 कोटी मंजूर

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : प्रधानमंत्री आवास (PM Awas Yojana) योजनेंतर्गत (शहरी) रावेर लोकसभा क्षेत्रातील दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापासून वंचित लाभार्थ्यांना ९० कोटी २८ लाख रुपये कोटी मंजूर करण्यात आले आहे. यासंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत केली होती मागणी. (Pradhan Mantri Awas Yojana 90 crore for disadvantaged beneficiaries Approved jalgaon news)

प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत डीपीआर-१ मध्ये स्वीकृत लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारा दुसरा व तिसरा हप्ता; डीपीआर-२ मध्ये स्वीकृत लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारे तीनही हप्ते मिळण्याबाबत खासदार खडसे यांनी लोकसभेत मागणी केली होती.

त्यानुसार रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रावेर, सावदा, फैजपूर, यावल, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव, जामनेर, शेंदुर्णी, मलकापूर व नांदुरा आदी नगरपरिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकार मिळून एकूण रुपये ९० कोटी २८ लाख रुपये निधी वर्ग करण्यात आलेला आहे, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

केंद्र सरकारकडून मिळणारे तीनही हप्ते राज्य सरकारमार्फत देण्यात आलेले नव्हते. सदर अनुदान हे केंद्र सरकारमार्फत राज्यांना आधीच वर्ग करण्यात आलेले होते, परंतु मागील महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीमुळे संबंधित लाभार्थी आजपर्यंत आवास योजना अनुदान हप्त्याच्या लाभापासून वंचित होते. राज्यातील सरकार बदलल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार या लाभाचे हप्ते वर्ग करण्यात आले आहे.