Pratibha Shinde
Pratibha Shindeesakal

Jalgaon News : देशातील अराजकतेविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश : प्रतिभा शिंदे

देशातील अराजकतेविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश : प्रतिभा शिंदेआज संपूर्ण देशात लोकशाहीमूल्य पायदळी तुडविले जात आहे.

Jalgaon News : देशातील अराजकतेविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश : प्रतिभा शिंदेआज संपूर्ण देशात लोकशाहीमूल्य पायदळी तुडविले जात आहे. देशाचे सरकार सामान्यांच्या हिताचे न राहाता केवळ मूठभरांच्या कल्याणासाठी काम करणारे बनले आहे.

देशातील वातावरण अराजकतेकडे जात आहे, त्याविरुद्ध लढण्यासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले आहे.(Pratibha Shinde statement of Joining Congress to fight against anarchy in country jalgaon news)

सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी २१ डिसेंबरला दिल्ली येथे खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. त्यानंतर त्या प्रथमच शुक्रवारी (ता. २२) जळगावात आल्या.

त्यांचे जळगाव रेल्वेस्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांनी प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर पंडित नेहरू, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काँग्रेस भवन येथे आली.

Pratibha Shinde
Jalgaon News : ‘शिवाजी महाराजांची लष्कर नीती’वर चर्चासत्र; 16, 17 फेब्रुवारीस आयोजन

त्या वेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्या म्हणाल्या, की देशात संवेदनशील माणसांनी एकत्र येण्याची व हुकूमशाही व्यवस्थेविरुद्ध लढण्याची गरज निर्माण झाली असल्यानेच आपण पक्षीय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठीच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. या वेळी जमील शेख, सरचिटणीस ज्ञानेश्‍वर कोळी, जगदीश गाढे, शहर सरचिटणीस राहुल भालेराव, भाऊसाहेब सोनवणे, मुकुंद सपकाळे, दिलीप सपकाळे आदी उपस्थित होते.

Pratibha Shinde
Jalgaon News : महसूल वसुली 100 टक्के करा : जिल्हाधिकारी प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com