School External Evaluation : जिल्ह्यातील 330 शाळांचे शाळा सिद्धी बाह्यमूल्यमापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

School External Evaluation : जिल्ह्यातील 330 शाळांचे शाळा सिद्धी बाह्यमूल्यमापन

जळगाव : समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हाभरातील शाळांचे शाळा (School) सिद्धी बाह्यमूल्यमापन करण्याची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. (process of external evaluation of school achievements under Samagra Shiksha will start from February 27 jalgaon news)

त्यासाठी जिल्ह्यातील दहा टक्के शाळांची निवड करण्यात आली असून, ३३० शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यासाठी शाळा सिद्धी निर्धारकांची ६० पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

शाळा सिद्धी समृद्ध शाळा हा केंद्र शासनाच्या न्यूपा, नवी दिल्ली अंतर्गत मूल्यांकनाचा कार्यक्रम निर्धारित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळांना प्रथम स्वयंमूल्यमापन करायला सांगितले जाते आणि त्यानंतर शासनातर्फे बाह्यमूल्यमापन करण्यात येते.

२०२०-२१ या वर्षात स्वयंमूल्यमापन पूर्ण केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक स्तरावरील दहा हजार व माध्यमिक स्तरांतील एक हजार ८५१ शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील २७८ प्राथमिक आणि ५२ माध्यमिक, अशा एकूण ३३० शाळांचे शाळा सिद्धी बाह्यमूल्यमापन होणार आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यासाठी शाळा सिद्धीचे प्रशिक्षण घेतलेले निर्धारक आणि तालुकानिहाय गटसाधन केंद्रातील विषय तज्ज्ञ यांच्या एकत्रीकरणातून दोन व्यक्ती असलेल्या ६० टीम तयार करण्यात आल्या आहेत.

या तज्ज्ञांद्वारे नियोजन

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, शाळा सिद्धीचे जिल्हा नियंत्रण अधिकारी तथा डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, शाळा सिद्धीचे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. जगदीश पाटील यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील शाळा सिद्धी बाह्यमूल्यमापनाचे नियोजन केले जात आहे.

टॅग्स :JalgaonschoolEvaluation