Latest Marathi News | गोळीबार प्रकरणातील संशयितांची मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon : गोळीबार प्रकरणातील संशयितांची मिरवणूक

जळगाव : जळगाव शहरातील आंबेडकरनगर गोळीबार प्रकरणातील संशयिताची जिल्‍हा कारागृहातून जामिनावर मुक्तता झाली. जामिनावर सुटताच या संशयिताची जेलगेटवरूनच जल्लोषात मिरवणूक काढण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत मात्र संबंधित पोलिस अधिकारी अनभिज्ञ आहेत.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात झालेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असलेला संशयित सतीश मिलिंद गायकवाड कारागृहातच होता. (Procession of suspects in shooting case Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon Crime Update : वीजचोरी विरोधात धडक कारवाई; 51 घरांमध्ये आढळली वीजचोरी

कारागृहात असताना इतर बंदिवान कैद्यांना मारहाण, उपचाराच्या नावाने जिल्‍हा रुग्णालयात सर्रास मोबाईल वापरासह आपल्या साथीदार, कुटुंबीयांच्या भेटीगाठी प्रकरणात चर्चेत आलेल्या सतीश गायकवाड या संशयिताची जिल्‍हा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या साथीदारांनी चक्क कारागृहाच्या गेटपासूनच त्याची जल्लोषात मिरवणूक काढली. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांच्याकडून या प्रकरणी माहिती घेण्यात येत आहे. संबंधित पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधपथक आणि प्रभारी अधिकारी मात्र दिवसभर गुन्हे आढावा बैठकीत असल्याने अनभिज्ञ आहेत.

हेही वाचा: Jalgaon : जिल्हा दूध संघाची आजपासून रणधुमाळी