Jalgaon News : प्रा. इक्बाल मिर्झा क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्‍मानित

Prof Iqbal Mirza Honored with Sports Life Award jalgaon news
Prof Iqbal Mirza Honored with Sports Life Award jalgaon newsesakal

Jalgaon News : जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे प्रा. इक्बाल मिर्झा यांचा क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने, तर जिल्‍ह्यातील १९ क्रीडाशिक्षकांचा जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्काराने सन्‍मान करण्यात आला. (Prof Iqbal Mirza Honored with Sports Life Award jalgaon news)

शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. साहित्यिक, कवी डॉ. मिलिंद बागूल अध्यक्षस्थानी होते. जळगाव महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. नारायण खडके, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी इ. आर. शेख, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तथा नगरसेवक नितीन बरडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश वेद,

महापालिका क्रीडाधिकारी दीनानाथ भामरे, क्रीडाधिकारी एम. के. पाटील, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. पी. आर. चौधरी, ग. स. सोसायटीचे संचालक अजय देशमुख, ‘खो-खो’चे राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. प्रदीप तळवलकर, कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे प्रमुख पाहुणे होते. जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी आभार मानले.

जिल्हा आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार्थी

क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रा. इक्बालबेग उस्मानबेग मिर्झा यांना, तर जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार हरी काळे (का. ऊ. कोल्हे विद्यालय), मुख्याध्यापक सुरेश बारी (बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली), आशिषकुमार चौधरी (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव), दिलीप संगेले (निवासी इंग्लिश स्कूल, यावल),

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Prof Iqbal Mirza Honored with Sports Life Award jalgaon news
Jalgaon Municipal Corporation : नव्या रस्त्यांची ‘अंत्ययात्रा’ काढणारी शहरद्रोही यंत्रणा!

मुख्याध्यापक एकनाथ महाजन (सरदार जी. जी. हायस्कूल रावेर), गणेश बोदडे ((स्व). निखिलभाऊ खडसे विद्यालय, मुक्ताईनगर), गिरीश पाटील (इंदिराबाई ललवाणी विद्यालय), सुनील पाटील (माध्यमिक विद्यालय, खाजोळा), नितीन सोनजे (सुमनताई गिरधर पाटील विद्यालय, भडगाव), सचिन महाजन (रे. ना. पाटील विद्यालय, रिंगणगाव), योगेश साळुंखे (गिरणा माध्यमिक विद्यालय, मेहुणबारे), रोहिणी जाधव (राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय, पारोळा), निवृत्ती पाटील (सरस्वती माध्यमिक विद्यालय, सडावण),

मनोज परदेशी (पी. आर. हायस्कूल, धरणगाव), जितेंद्र महाजन (भाऊसो शा. शि. पाटील विद्यालय, चहार्डी), मेघश्‍याम शिंदे (सेंट अलॉयसिस हायस्कूल, भुसावळ), छाया बोरसे (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव), विजय विसपुते (उज्वल स्पराऊटर्स), प्रा. खुशाल देशमुख (के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेज, चाळीसगाव) यांना देण्यात आले,

तर डॉ. विलास नारखेडे यांना सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रवीण पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्‍याबद्दल व अनिल माकडे यांची राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

Prof Iqbal Mirza Honored with Sports Life Award jalgaon news
Pachora Market Committee Election : बाजार समितीत खऱ्या भाजपसोबत युती : किशोर पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com