Marathi Sahitya Sammelan Amalner : साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

program of Sahitya Sammelan has been announced Jalgaon news
program of Sahitya Sammelan has been announced Jalgaon news esakal

Marathi Sahitya Sammelan Amalner : सानेगुरुजी साहित्यनगरी, अमळनेर (जि. जळगाव), ता.१७ : येथे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर करण्यात आल्याची माहिती मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली.

या संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवी संमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानी असेल.(program of Sahitya Sammelan has been announced Jalgaon news )

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकानुसार १ फेब्रुवारी २०२४ ला संमेलनपूर्व कार्यक्रम म्हणून बालमेळावा होईल. यात बालनाट्य तसेच साने गुरुजींच्या जीवनावर आधारित नाट्य प्रवेश-नाट्यछटा, गाणी सादर होतील.

२ फेब्रुवारीला संमेलनाची सुरवात सकाळी साडेसातला ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर सकाळी साडेदहाला उद्घाटन समारंभाआधी ध्वजारोहण व ग्रंथ दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. दुपारी दोनला बालसाहित्य संमेलनातील निवडक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. दुपारी साडेतीनला मुख्य सभागृहात होणाऱ्या परिसंवादाचा विषय असेल ‘राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय’.

संध्याकाळी साडेपाचला कविसंमेलन होईल. रात्री साडेआठला स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दुसऱ्या सभागृहात अडीचला ‘कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक’ या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी साडेतीनला शासकीय परिसंवाद सादर होईल. संध्याकाळी पाचला ‘स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान’ या विषयावर स्थानिक वक्त्यांची भाषणे होतील.

३ फेब्रुवारीला संमेलनाची सुरवात सकाळी नऊला गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीने होईल. मुख्य मंडपात सकाळी अकराला ‘आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत चालली आहेत का?’ आणि दुपारी बाराला ‘अलक्षित साने गुरुजी’ या विषयांवर परिसंवाद होईल. यात साने गुरुजींच्या पुतणी सुधाताई साने यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

program of Sahitya Sammelan has been announced Jalgaon news
Marathi Sahitya Samelan Amalner : 97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समित्यांची घोषणा : डॉ. नरेंद्र पाठक

दुपारी दोनला होणाऱ्या परिसंवादाचा विषय असेल 'आंतरभारती काल-आज-उद्या.' दुपारी दोनला ‘आठवणीतल्या कविता-रसास्वाद’, संध्याकाळी सहाला कविसंमेलन-२ होणार आहे. रात्री साडेआठला स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल. सभागृह दोनमध्ये सकाळी दहाला चैत्राम पवार यांची मुलाखतीनंतर दुपारी अकराला मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे’ या विषयावर परिसंवाद होईल.

दुपारी बाराला स्थानिक बोलीभाषेवर कार्यक्रम सादर करतील. दुपारी दीडला कथाकथन, दुपारी चारला ‘कळ्यांचे निःश्वास’ परिचर्चा होईल. संध्याकाळी सहाला स्थानिक लोकांचा अभिवाचनाचा कार्यक्रम होईल. ४ फेब्रुवारीला सकाळी नऊला श्री. बाबासाहेब सौदागर यांची मुलाखतीनंतर साडेदहाला अभिरूप न्यायालय होईल. यात ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज नाहीत’ या विषयावर चर्चा होईल.

दुपारी बाराला परिसंवाद मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल’ यावर होईल. दुपारी तीनला लेखिका मीना प्रभू आणि प्रकाशक चंद्रकांत लाखे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. दुसऱ्या मंडपात सकाळी साडेनऊला होणाऱ्या परिसंवादाचा विषय असेल ‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य’.

सकाळी अकराला साहित्यिकांचे शताब्दी स्मरणमध्ये शाहीर साबळे, जी. ए. कुलकर्णी, के. ज. पुरोहित-शांताराम, श्री. पु. भागवत, विद्याधर गोखले, विद्याधर पुंडलिक, आदी. साहित्यिकांचे स्मरण करण्यात येईल. दुपारी दोनला ‘भारतीय तत्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती’ या विषयावर परिसंवाद होईल. दोन दिवस कवी कट्टा, एक दिवस गझल कट्टा हे कार्यक्रम होतील.

program of Sahitya Sammelan has been announced Jalgaon news
Marathi Sahitya Sammelan Amalner : मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; नोंदणीला सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com