बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर लावलेले पठाणचे पोस्टर फाडले. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bajrang Dal activists tearing down Pathan posters at Prakash Theatre

Jalgaon News : पाचोऱ्यात बजरंग दलाचे आंदोलन

पाचोरा (जि. जळगाव) : येथील बजरंग दलाच्या वतीने देशमुखवाडी भागातील प्रकाश चित्रपटगृहात रिलीज झालेल्या पठाण चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. (protest movement held raising slogans against Pathan film by Bajrang Dal movement jalgaon news)

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर लावलेले पठाणचे पोस्टर फाडले.

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सचिन येवले, अभिषेक पाटील, अभिषेक नाथ, गौरव राजपूत, बंटी भोई, चेतन भोई, गोलू महाजन, प्रशांत सोनार, गोपाल सोनार, सागर भोई, पप्पू पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी थिएटर बाहेर घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

बाहेर लावलेले पोस्टर फाडले व प्रकाश थिएटरचे मालक मनीष काबरा यांना चित्रपट न दाखविण्याचे व चित्रपट कोणीही न पाहण्याचे आवाहन केले.