PSI Success Story : प्रतिकुल परिस्थितीवर मात करत कटलरी व्यावसायिकाचा मुलगा बनला ‘पीएसआय’

gaurav bhavsar
gaurav bhavsar esakal

PSI Success Story : मनाची जिद्द, चिकाटी व मेहनतीची तयारी असेल तर कोणतेही ध्येय सहज साध्य करता येते. (psi success story gaurav bhavsar becomes psi jalgaon news)

नगरदेवळ्यातील गौरव भावसार या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या परीक्षेत इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) दोनशे पंधराव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.

प्रतिकुल परिस्थितीत नावाप्रमाणेच परिवाराचा व गावाचा गौरव केला असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नगरदेवळा येथील कटलरी व्यावसायिक संजय भावसार सपत्नीक खेडोपाडी जाऊन आपला व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका भागवत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gaurav bhavsar
Success Story: कठीण परिश्रमाच्या जोरावर यशाला गवसणी! पोलिस अकादमीतील मुख्य स्वयंपाकीचा मुलगा बनला PSI

त्यांना दोन मुले असून, परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या ध्यास मनी बाळगत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते.

लहान गौरवच्या मेहनतीला फळ लागले असून, मोठा शुभम हा देखील उच्च पदस्थ नोकरीला लागेल, या सुखद भावनेतून ज्या मातेने जीवाची पराकाष्टा करत पतीला खऱ्या अर्थाने साथ देत परिवाराचा गाडा ओढला त्या मातेचे गेल्या चार महिन्यांपूर्वी निधन झाले.

मुलाचे कौतुक करत मायेची थाप मारणारी आईच या जगात नसल्याने तिची उणीव परिवारात भासत अससून, ते मनाला बोचत असले तरी आई वडिलांच्या मेहनतीला फळ मिळाल्याचे पाणावलेल्या डोळ्यांनी गौरवने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

gaurav bhavsar
PSI Success Story: गोंदेच्या जिगरबाज युवकाची थक्क करणारी किमया! फौजदारच्या यशाला मेहनतीची सोनेरी झालर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com