Dhanteras 2023: गतवर्षीपेक्षा यंदा 20 टक्क्यांनी वाढली सोन्याची खरेदी; ग्राहकांनी ‘धनत्रयोदशी’चा साधला मुहूर्त

Dhanteras 2023: गतवर्षीपेक्षा यंदा 20 टक्क्यांनी वाढली सोन्याची खरेदी; ग्राहकांनी ‘धनत्रयोदशी’चा साधला मुहूर्त
Updated on

Dhanteras 2023 : दिवाळीच्या मंगल पर्वाच्या दुसरा दिवस धनत्रयोदशी (धनतेरस) निमित्त नागरिकांनी घरातील धनाची पूजा केली. या मुहूर्ताचा योग साधून अनेकांनी यादिवशी सोने खरेदी केली.

यामुळे शहरातील सराफ बाजारातील अनेक सुवर्णपेढ्यामध्ये सकाळपासून गर्दी दिसून आली. गेल्या वर्षांपेक्षा यंदा सोने खरेदीत २० टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. (purchase of gold has increased by 20 percent this year compared to last year jalgaon news)

काल (ता.९) दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस ने साजरा झाला. महिलांनी गाईचे पूजन सायंकाळी केले होते. धनत्रयोदशीला घरातील साठविलेल्या धनाची, सोने, दागिन्यांची सायंकाळी पूजा केली जाते. सोबतच नवीन खरेदी केलेले सोनेही पूजेत ठेवले जाते.

सोनेखरेदीस प्रतिसाद

दिवाळीचे पर्व सोने खरेदीला शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला खरेदी केलेले सोने मोडण्याची वेळ येत नाही. यामुळे नागरिकांनी शहरातील विविध ठिकाणच्या सोने पेढीवर खरेदीसाठी गर्दी केली होती. जळगावचा सुवर्णबाजार देशभरात प्रसिद्ध आहे.

Dhanteras 2023: गतवर्षीपेक्षा यंदा 20 टक्क्यांनी वाढली सोन्याची खरेदी; ग्राहकांनी ‘धनत्रयोदशी’चा साधला मुहूर्त
Gold Rate: सोन्याच्या भावात मोठी वाढ; दिवाळीपर्यंत सोने किती महागणार?

शुद्ध व विश्‍वासाच्या कसोटीवर उतरणारे सोने म्हणून राज्यासह देशातून ग्राहक जळगाव येथे खरेदीसाठी येतात. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अनेक ग्राहकांनी आज सुवर्ण बाजारात गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत सोन्याचे शोरूम खुले होते.

हलके दागिने, आकर्षक दागिने, विविध प्रकाराचे कानातील डुल, रिंग, बांगड्या, सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील सोन्याचे हार, नाकातील नथ खरेदीस महिलांचा चांगला प्रतिसाद होता. सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी प्रतितोळा ६० हजार ७००, २२ कॅरेट सोन्यासाठी ५५ हजार ६०० तर चांदीचा दर प्रती किलो ७२ हजार (विना जीएसटी) होता. दिवाळीचे पर्वात सोन्याला चांगली मागणी असेल. नंतर सुरू होणारे लग्नसराईतही सोन्याला पसंती असेल, अशी माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली.

Dhanteras 2023: गतवर्षीपेक्षा यंदा 20 टक्क्यांनी वाढली सोन्याची खरेदी; ग्राहकांनी ‘धनत्रयोदशी’चा साधला मुहूर्त
Narak Chaturdashi Laxmi Puja : मनाची ऊर्जा वाढविणारा सण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com