जळगाव : शहरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेत तडजोड करणार नाही

जिल्हाधिकारी राऊत : आयुक्तांसमवेत अचानक पाहणी
quality of road work city
quality of road work city
Updated on

जळगाव : शहरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला. त्यांनी शनिवारी (ता. २२) महापालिकेचे आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी यांच्यासमवेत अचानकपणे कामांची पाहणी केली.

quality of road work city
जळगाव : कोरोनाच्या नियमाचे उल्लघंन करणाऱ्या आर्यन रिसॉर्टला ५० हजारांचा दंड

जळगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती, शासनाकडून निधी प्राप्त होताच शहरातील प्रमुख सात रस्त्यांची कामे सुरूही करण्यात आली आहेत. स्वातंत्र्य चौक ते पांडे डेअरीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. आयुक्त डॉ. सतीश कुळकणी व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी दुपारी अचानक या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. अचानक केलेल्या पाहणीमुळे अधिकाऱ्यांसह कर्मचांऱ्याचीही ताराबंळ उडाली. मक्तेदार अभिषेक पाटील उपस्थित होते. या वेळी त्यांना काही सूचनाही करण्यात आल्या. कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, रस्त्याची कामे टिकाऊ होणे आवश्‍यक आहे, या कामांचे ऑडिट केले जाणार आहे. काम योग्य पद्धतीने न झाल्यास संबधितावर कारवाई करण्यात येईल असा ईशाराही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Why are electric vehicles becoming popular in Maharashtra?
Marathi News Esakal
www.esakal.com