लहान मुलींच्या भांडणाच्या वादाचे रुपांतर झाले दंगलीत

लहान मुलींच्या भांडणातून झाले मोठ्यांमध्ये वाद
fighting
fighting sakal
Updated on

यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील किनगाव येथे अंगणवाडीत जाणाऱ्या लहान मुलींचे भांडण झाले. त्यातून मोठ्यांमध्ये वाद झाला. या वादात संतप्त मुलीच्या आईने चुलत दीर, पतीसह इतरांना माहेरील लोकांसह तृतीयपंथीना सोबत घेत मारहाण केली. या प्रकरणी येथील पोलिसात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनगाव (ता. यावल) येथील भूषण शिवाजी साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या चुलत भावाच्या मुलीने अंगणवाडीमध्ये त्यांच्या मुलीस मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी त्याची आई मुलीच्या आईकडे गेली. तेव्हा बालिकेची आई मोना संदीप साळुंके हिने साळुंके यांच्या आईला शिवीगाळ केली व वाद वाढला. या वादात मोना हिचे पती संदीप साळुंके यांनी देखील पत्नी मोना हिला कानशिलात मारली. याचा राग येत मोना संदीप साळुंखे ही जळगाव माहेरी निघून गेली. जळगाव येथील आयोध्यानगरातील तिचे वडील बाबुराव मेढे, भाऊ संजय बाबुराव मेढे, सुनीता बाबुराव मेढे, गणेश बापूराव मेढे व जळगावातील चार तृतीयपंथी असे किनगाव येथे आले व त्यांनी फिर्यादी भूषण साळुंके, मोना हिचे पती संदीप साळुंखे, अर्चना साळुंके यांना मारहाण केली. यामध्ये अर्चना साळुंके तिला उजव्या डोळ्याच्या भुवईवर दुखापत झाली. या मारहाणीसह आलेल्या सर्वांनी भूषण साळुंके यांच्या घराची नासधूस केली. तर भांडण वाढत असल्याचे पाहून त्याच भागातील अक्षय बापू साळुंखे, अभिजित किरण साळुंके, योगेश साळवे, विशाल शिवाजी साळुंके यांनी तेथे येऊन भांडण थांबविले व जखमींना यावल ग्रामीणमध्ये आणून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले. वरील फिर्यादीनुसार लहान मुलींच्या भांडणाचा वाद वाढत मोना साळुंके, तिचे वडील बाबुराव मेढे, भाऊ संजय मेढे, सुनीता मेढे, गणेश मेढे व जळगावातील चार तृतीयपंथी यांनी लाठ्याकाठ्या घेऊन फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण करून गंभीर जखमी केले व घरातील तोडफोड केली म्हणून दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अजिज शेख, हवालदार नरेंद्र बागुले तपास करीत आहेत.

fighting
कोथिंबीर खाल्ल्याने असे मिळतील आरोग्यविषयक फायदे
fighting
पत्नीचा गळा चिरून पतीची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com