पत्नीचा गळा चिरून पतीची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Crime news
Crime newsesakal
Updated on

म्हसरूळ (जि. नाशिक) : मखमलाबाद शिवारातील रामकृष्णनगरमध्ये मंगळवारी (ता. ७) दुपारी पतीने पत्नीचा गळा चिरून स्वतः राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत पीडित महिला गंभीर असून, खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहे. राजू रतनसिंग ठाकूर (५५, रा. फ्लॅट न.६, लक्ष्मी रेसिडेन्सी, रामकृष्ण नगर, मखमलाबाद शिवार), असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. (Husband commits suicide after attempt to kill wife Nashik Crime News)

Crime news
Nashik : 18 वर्षांपुढील 77 टक्‍के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

राजू रतनसिंग ठाकूर हे टेम्पो चालक होते. मंगळवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी असताना चारित्र्याच्या संशयावरून पत्नी चंदा ठाकूर (४५) यांच्याशी वाद झाला. या वेळी त्या दोघांच्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. संतप्त झालेल्या राजू यांनी किचनमधून चाकू आणत पत्नी चंदा यांच्या गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले. केलेला वार हा पती चंदा यांच्या वर्मी बसला होता. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असतानाच राजू ठाकूर यांनी तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. डोक्यास मार लागल्याने ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती कळताच म्हसरुळ पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक नलवडे व म्हसरूळ गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सुधीर पाटील, अहिरे व अन्य पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत म्हसरुळला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

Crime news
विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसावी लागेल : ना. छगन भुजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sanjay Garud Arrest Latest News
Saikheda schoolgirl story
Nashik Earthquake
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
Marathi News Esakal
www.esakal.com