फुकट्या प्रवाशांकडून 12 कोटींचा दंड वसूल : रेल्वेची विशेष मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian railway

फुकट्या प्रवाशांकडून 12 कोटींचा दंड वसूल : रेल्वेची विशेष मोहीम

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम एक एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. एक एप्रिल ते १५ मे २०२२ या कालावधीत तिकीट तपासणीसाठी १ लाख ५० हजार २५१ फुकट्या प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून १२ कोटी ४६ लाख ८३ हजार ४३४ दंड वसूल करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे.

भुसावळचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. शिवराज मानसपूरे यांच्या मार्गदर्शनानुसार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुणकुमार, सहायक वाणिज्य प्रबंधक अनिल पाठक, विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय. डी. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षी १ एप्रिल ते १५ मे २०२१ या कालावधीत ७७ हजार ९२३ केसेसद्वारे ६ कोटी ३० लाख ७६ हजार ९८८ एवढा दंड वसूल करण्यात आला होता.

हेही वाचा: Youtube पाहून तो घरातच छापायचा बनावट नोटा; हिंगणेच्या तरुणाचा प्रताप

दरम्यान, उत्तम सुरक्षितता आणि प्रवाशांच्या अनुभवासाठी रेल्वेने ट्रेन क्रमांक १५६४५/१५६४६ लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्स्प्रेसचा शेवटचा रेक कायमस्वरूपी एलएचबी डब्यांसह बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. एलएचबी कोचची सुधारित संरचना असलेली ट्रेन आता २५ मे २०२२ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस, त्याच दिवसापासून गुवाहाटी येथून चालेल. सुधारित संरचना अशी : एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार, १ जनरेटर व्हॅन, असे स्वरूप राहणार आहे.

हेही वाचा: तो वेडा आहे सांगणाऱ्या पोलिसांनाच बनवले ‘मामू’; कैद्याने काढला पळ

Web Title: Railway Department Recovered A Fine Of Rs 12 Crore From Without Ticket Passengers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top