Jalgaon Crime News : रेल्वे पोलिसांनी 29 अल्पवयीन घेतले ताब्यात | Railway police detained 29 minors from bhusawal railway jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhusawal railway station

Jalgaon Crime News : रेल्वे पोलिसांनी 29 अल्पवयीन घेतले ताब्यात

Jalgaon News : दानापूर पुणे एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाने रेल्वे ट्विटर केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेत रेल्वे आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ रेल्वे स्थानकांवरील रेल्वेतून २९ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. (Railway police detained 29 minors from bhusawal railway jalgaon crime news)

बिहार येथील रहिवासी (हजरत मौलाना) महम्मद आलम हे बिहार अररिया येथून बसने २९, तर त्यांच्यासोबत दोन मौलाना २४ अल्पवयीन मुलांना घेऊन प्रवास करीत असताना त्यांच्याजवळ कोचमध्ये कोणीही सोबत नसल्याबाबतची तक्रार प्रवाशाने रेल्वे ट्विटर केली होती.

२९ अल्पवयीन मुले भुसावळ लोहमार्ग पोलिस स्टेशन बसविण्यात आले आहे. नंतर काही वेळाने हजरत मौलाना महम्मद आलम हे पोलिस स्टेशनला आले. सदरील मुले हे अरेरिया येथून शिक्षणासाठी सांगली तय्याबा एज्युकेशन मदरसा पुणे येथे घेऊन जात होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामध्ये आठ ते पंधरा वयोगटांतील मुले असून त्यातील बरेच मुलांचे वय हे एकसारखे आहे. सर्व मुलांना मेडिकल साठी पाठविण्यात आले असून सर्वांना बाल कल्याण समिती जळगाव येथे रवाना करणार असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितले.