Mon, June 5, 2023

Jalgaon Crime News: राजस्थानाच्या ठगबाजास अटक
Published on : 21 March 2023, 10:37 am
जळगाव : बांधकामास लागणारे स्टिल मटेरियल पाठवितो, असे सांगत वृद्धाची १६ लाखांत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ललितकुमार तुलसीराम खंडेलवाल (वय ३८, रा. छिपावली, ता. जि. सिरोही, राजस्थान) याला सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली.
रावेर येथील मोहनलाल देवजी पटेल यांना संशयित ललितकुमार खंडेलवाल याने फोनवरून ‘आमची आयएसओ टॉप्स इंडिया मेटल ट्रेडर्स’ नावाची कंपनी आहे. आम्ही तुम्हाला बांधकामासाठी लागणारे स्टिल मटेरियल पाठवितो, असे सांगून विश्वास संपादन केला, तसेच त्यांना टॅक्स इन्व्हॉईस व बनावट ई बिल पाठवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख २७ हजार रुपये घेऊन त्यांची ऑनलाईन फसवणूक केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर १५ मार्चला संशयित ललितकुमार खंडेलवाल याला सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली.
हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच