Jalgaon : ‘रावेर विकासो’मधून राजीव पाटील यांची माघार; अरुण पाटील यांना पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Logo

‘रावेर विकासो’मधून राजीव पाटील यांची माघार; अरुण पाटील यांना पाठिंबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील उमेदवार व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांनी माघार घेतली आहे, त्यांनी ‘राष्ट्रवादी’चे अरुण पाटील यांना पाठिंबा दिला. मात्र काँग्रेसची रणनीती चुकली असून, त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपण आमदार शिरीष चौधरी यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जळगाव येथील पणन संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद झाली. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, माजी आमदार अरुण पाटील, रावेर काँग्रेसचे पदाधिकारी ज्ञानेश्‍वर महाजन उपस्थित होते. राजीव पाटील म्हणाले, की आपल्याला निवडणूक लढवायची नव्हती मात्र आपण आमदार शिरीष चौधरी यांच्या भेटीला गेलो, तेव्हा चर्चा झाली त्यावेळी सांगण्यात आले, की जर स्बळावर लढण्याची वेळ आली तर त्या दृष्टीने तयारी व्हावी म्हणून आपण उमेदवार म्हणून जिल्हा बँक अर्ज दाखल करून ठेवावा, त्यानुसार आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रावेरची जागा काँग्रेसला मिळावी, असा आपला विचार होता.

महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये काँग्रेसतर्फे जनाबाई महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांनीही अरुण पाटील यांना पाठिंबा देत माघार घेतली. आपल्याला मात्र काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने संपर्क साधला नाही. त्यामुळे तांत्रिक बाबीमुळे आपला अर्ज कायम राहिला. आपण रावेर विकासो मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण पाटील यांना पाठिंबा जाहीर करीत आहोत. तर इतर मागासवर्ग गटातील आपला अर्ज कायम असला तरी आपण लढणार नाही, परंतु आपण कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी जी भूमिका घेतली, त्यावर आपण नाराज आहोत, या निवडणुकीत काँग्रेसला काहीही मिळाले नाही, जे दोन उमेदवार उभे केले आहेत. त्यांचाही काँग्रेसशी संबंध नाही, त्यांचे साधे पक्षाचे सदस्यत्वही नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेबाबत आपण आमदार शिरीष चौधरी यांच्याशी चर्चा करणार आहोत. जर समाधान झाले नाही तरी वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत.

loading image
go to top