न्यायालयावर विश्‍वास, योग्य तो न्याय मिळेल : रक्षा खडसे

माजी मंत्री एकनाथ खडसेंवरील ‘ईडी’च्या कारवाईसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
Raksha Khadse- Eknath Khadse
Raksha Khadse- Eknath Khadseesakal
Updated on

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसेंवरील (Eknath Khadse) ‘ईडी’च्या (ED) कारवाईसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. न्यायव्यवस्थेला आपण मानतो, त्यामुळे त्यातून योग्य तो न्याय मिळेल, अशी अपेक्षा भाजप खासदार तथा खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी व्यक्त केली.

भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. खडसेंवरील कारवाई त्या यंत्रणेच्या दृष्टीने योग्य असेल, मात्र आमच्या दृष्टीने ती योग्य नाही. शिवाय, आपण सर्व न्यायव्यवस्थेला मानणारे आहोत, त्यामुळे याबाबत न्यायालय योग्य निर्णय करेल, असे त्या म्हणाल्या.

Raksha Khadse- Eknath Khadse
मक्तेदारावर नाही दबाव... प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या एकीचा अभाव

राज्य सरकारकडून राजकारण

केंद्र सरकारच्या योजनांबाबत राज्यातील सरकार नेहमीच राजकारण करत आले आहे. घरकुल योजनांच्या संदर्भात अनेक पात्र लाभार्थ्यांना डावलून अन्य लोकांची नावे पुढे करण्यात आली. आपल्या जिल्ह्यात ‘रुरबन’अंतर्गत तीन ठिकाणी क्लस्टर झाले. केंद्र सरकार ६० टक्के व राज्य सरकारचा त्यासाठी ४० टक्के निधी होता. मात्र राज्याने निधीच दिला नाही, म्हणून केंद्राचाही निधी परत गेला. असे बऱ्याच योजनांबाबत होते, असा आरोपही खासदार खडसे यांनी केला.

Raksha Khadse- Eknath Khadse
पोलिसांची ड्यूटी आठ तासांची करा; पोलिस मित्र संघटनेतर्फे निवेदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com