
जळगाव : जळगाव ग्रामीणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रमेश माणिक पाटील यांच्यासह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. ७) मुंबईत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. (Ramesh Patil entry into Shiv Sena Thackeray group in Mumbai Latest Jalgaon News)
राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश माणिक पाटील, उमेश रावसाहेब पाटील, प्रवीण कौतिक पाटील, छोटू सुकदेव पाटील, भाऊसाहेब सुकदेव सोनवणे, डॉ. जुबेर खान, चेतन पुंडलिक सोनवणे यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी, जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे, उपजिल्हा प्रमुख ॲड. शरद माळी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. शिवसेना घराघरांत पोहोचविण्याचे कार्य करावे, असे अवाहनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.