Raver Lok Sabha Constituency : ईश्‍वरबाबूंकडून खडसेंना चॅलेंज अन्‌ रक्षाताई उमेदवार; 2014च्या उमेदवारीची ‘इनसाईड स्टोरी’

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सक्रिय असलेले शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय, तत्कालिन राज्यसभा सदस्य ईश्‍वरलाल जैन यांचे पुत्र मनीष जैन यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली.
Eknath Khadse, Raksha Khadse, Ishwarlal Jain, Manish Jain
Eknath Khadse, Raksha Khadse, Ishwarlal Jain, Manish Jainesakal

Jalgaon News : सन २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सक्रिय असलेले शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय, तत्कालिन राज्यसभा सदस्य ईश्‍वरलाल जैन यांचे पुत्र मनीष जैन यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली. ईश्‍वरबाबुजींनी ‘खडसे’ नावाचे कुणी असते तर निवडणुकीत मजा आली असती, असे चॅलेंज देत एकनाथ खडसेंना डिवचले. (Raver Lok Sabha Constituency Challenge to Eknath Khadse from Ishwarlal Jain)

मागे हटतील ते खडसे कसले, म्हणून त्यांनीही हे चॅलेंज स्वीकारले अन्‌ तत्कालिन खासदार हरिभाऊ जावळेंची जाहीर झालेली उमेदवारी रद्द होऊन रक्षा खडसे उमेदवार म्हणून समोर आल्या. एकनाथ खडसेंच्या वर्चस्वाखालील मतदारसंघ म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाची लढत नेहमीच चर्चेची ठरत असते; तशी ती या वेळीही ठरतेय. भाजप नेत्यांशी बेबनावानंतर एकनाथ खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

मात्र, त्यांच्या स्नुषा रक्षा खडसेंनी भाजपशी साथ सोडली नाही. पक्षाची भूमिका म्हणून खडसेंनी नेहमीच भाजप नेत्यांवर आरोप केले. या पार्श्‍वभूमीवर रक्षा खडसेंना भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही, अशीच अटकळ होती. ती बाजूला सारत पक्षाने रक्षा खडसेंवर विश्‍वास दर्शवित त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यानिमित्ताने त्यांना पहिल्यांदा २०१४ मध्ये मिळालेल्या उमेदवारीचा किस्सा पुन्हा चर्चेत आला.

काय घडले होते तेव्हा?

२०१४ ला खरेतर देशभरात सर्वत्र मोदी लाट होती. विविध माध्यमांच्या सर्वेक्षणातून मोदींच्या नेतृत्वात भाजपचे सरकार येईल, असेच रिपोर्ट येत होते. तरीही कोणत्या मतदारसंघात काय होईल, याबद्दल ठामपणे काही सांगता येत नव्हते. (latest marathi news)

Eknath Khadse, Raksha Khadse, Ishwarlal Jain, Manish Jain
Loksabha Election: गडकरी, पारवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, तर रामटेकसाठी काँग्रेसचा बॅकअप प्लॅन तयार

भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीतच रावेरसाठी हरिभाऊ जावळे व जळगावातून ए. टी. पाटील यांची उमेदवारी ‘रिपीट’ करण्यात आली. त्याच दरम्यान ही जागा आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आली आणि शरद पवारांचे निकटवर्तीय ईश्‍वरलाल जैन यांचे पुत्र व तेव्हाचे विधान परिषद सदस्य मनीष जैन यांना उमेदवारी मिळाली.

जैनांचे खडसेंना चॅलेंज

रावेरमधून रक्षा खडसेंच्या नावाची चर्चाही नव्हती किंवा त्या इच्छुकही नव्हत्या. त्याआधी त्यांनी कोथळीच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व सभापती म्हणून प्रभावीपणे कामकाज पाहिले होते. निवडणुकीच्या काळात ईश्‍वरलाल जैन व खडसेंमध्ये तीव्र बेबनाव होता. मनीष जैन यांनी खडसेंचे पुत्र निखिल यांना विधान परिषद निवडणुकीत पराभूत केले होते.

तो पराभव खडसेंच्याही जिव्हारी लागला होता. लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर व विशेषत: हरिभाऊ जावळेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ईश्‍वरलाल जैन यांनी खडसेंना डिवचत ‘खडसे नाव समोर असते तर मजा आली असती..’ असे चॅलेंज केले. खडसेंनी ती चॅलेंज स्वीकारले होते.

.. अन्‌ रक्षा बनल्या उमेदवार

रावेर मतदारसंघातून जावळेंविषयी नाराजीही समोर येत होती. अर्थात, त्यांच्या उमेदवारीने कुणी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे वगैरे दिलेले नव्हते. पण, सर्व्हे रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचे सांगण्यात येत होते. हीच बाब हेरुन खडसेंनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. तत्कालिन भाजप अध्यक्ष राजनाथसिंग यांच्याशी खडसेंचे निकटचे संबंध होते. त्यांना खडसेंची बाजू उजवी वाटली आणि त्यांनी जावळेंची उमेदवारी रद्द करुन रक्षा खडसेंचे तिकीट निश्‍चित केले.. अन्‌ रक्षा खडसे उमेदवार व खासदारही बनल्या.

Eknath Khadse, Raksha Khadse, Ishwarlal Jain, Manish Jain
Sangli Loksabha Constituency : चंद्रहार सेनेच्या यादीत,विशाल पाटील दिल्लीत ; सांगलीबाबत वेगवान घडामोडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com