Loksabha Election: गडकरी, पारवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, तर रामटेकसाठी काँग्रेसचा बॅकअप प्लॅन तयार

नागपूरचे उमेदवार, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महातुयीचे उमेदवार राजू पारवे बुधवारी (ता.२७) आपआपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामुख्याने नागपूरला येणार आहेत.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Esakal

Nagpur Loksabha Form Filling: नागपूरचे उमेदवार, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महातुयीचे उमेदवार राजू पारवे बुधवारी (ता.२७) आपआपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामुख्याने नागपूरला येणार आहेत.

गडकरी तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सोमारे जात आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पराभूत केले आहे. यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात शहराध्यक्ष व पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.

आता गडकरी ‘हॅट्‍ट्रिक'' करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या ते आपल्या शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकानाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. गडकरींच्या उमेदवारी अर्जाच्या माध्यमातून भाजपही शक्तिप्रदर्शन करणार आहे.

काँग्रेसचा बॅकअप प्लान तयार

उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिंदे सेनेच्यावतीने रामटेकची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदार कृपाल तुमाने यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. पारवे यांच्या विरोधात काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर भाजपचा आक्षेप आहे.

Nitin Gadkari
Nagpur Crime: फोनवर मोठ्याने बोलण्यावरून झाला वाद, बापानेच डोक्यात रॉड घालून मुलाला संपवलं

राज्य शासनाने त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहे. हे बघता काँग्रेसच्या काही उमेदवारांनी वेळेवर अडचण येऊ नये याकरिता उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला आहे. बर्वे यासुद्धा बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बुधवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

Nitin Gadkari
UFO in India : तामिळनाडूमधील न्यूक्लिअर प्लांटजवळ फिरतायत उडत्या तबकड्या? पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com