Latest Marathi News | महापालिका आयुक्तपदाच्या अधिकाराबाबत पुन्हा तारीख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation News

Jalgaon News : महापालिका आयुक्तपदाच्या अधिकाराबाबत पुन्हा तारीख

जळगाव : महापालिकेच्या आयुक्तपदाच्या अधिकाराबाबत ‘मॅट’ मध्ये सुरू असलेली सुनावणी पाच जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तपदाचे पूर्ण अधिकार कोणाकडे हा प्रश्‍न कायम आहे. दरम्यान, उद्या (ता.२१) महासभा होणार आहे.

महापालिकेचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आपल्या बदली विरोधात ‘मॅट’ (महाराष्ट्र ॲडमिनीस्ट्रेटीव्ह ट्रीब्युनल) मध्ये याचिका दाखल केली होती. त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली, परंतु पदभार घेतलेले आयुक्त देविदास पवार यांच्याकडेच पदभार ठेवण्यात आला. त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत मनाई करण्यात आली आहे. (Re date regarding powers of Municipal Commissioner Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon News | टोळी युद्धाचा भडका ; जळगावात तरुणाचा चॉपरने भोसकून खून

‘मॅट’ मध्ये आज सुनावणी झाली. मात्र पाच जानेवारी रोजी पुढील सुनावणीचा आदेश देण्यात आला. आज झालेल्या सुनावणीत महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

या प्रतिज्ञापत्रावर अभ्यास करण्यासाठी डॉ. गायकवाड यांच्या वकिलांनी वेळ मागितला. मॅट ने ही मागणी मान्य करीत पुढील सुनावणी पाच जानेवारी रोजी घेण्याचा आदेश दिला. डॉ. गायकवाड यांच्यातर्फे अविनाश देशमुख तर देविदास पवार यांच्यातर्फे एस.एस. ठोंबरे यांनी काम पाहिले.

‘मॅट’ने आज कोणतेही नवीन आदेश न करता जुनेच आदेश कायम ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्तपदाचा पदभार देविदास पवार यांच्याकडेच राहील. मात्र त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Jalgaon News : Lions Expoचे थाटात भूमिपूजन! अमळनेर येथे 6 ते 10 जानेवारी दरम्यान आयोजन

फाईली रखडल्या

महापालिका आयुक्त देविदास पवार यांना धोरणात्मक निर्णयावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नसल्याने महापालिकेत अनेक महत्त्वपूर्ण फाईली रखडल्या असल्याचे सांगण्यात आले. निर्णयासाठी अनेक फाईली आयुक्तांच्या दालनात पडून असल्याचे सांगण्यात आले.

आज महासभा

महापालिकेची महासभा उद्या (ता.२१) होणार आहे. सकाळी दहा वाजता सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही सभा होणार आहे. महापौर जयश्री महाजन पीठासीन अध्यक्षपदी असतील. यात एकूण ३५ विषयावर चर्चा होणार आहे. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी फाईली रखडल्याने सभेत आयुक्तांच्या अधिकाराबाबतही सदस्य प्रश्‍न विचारण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Jalgaon News | आधारकार्डाला 10 वर्षे झाली असल्यास अद्ययावत करा : जिल्हाधिकारी अमन मित्तल