Jalgaon Crime News : खरे पोलिस गायब, तोतया पोलिसांनी घेतला Charge

Crime News
Crime Newsesakal

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कर्मचारी असल्याची बतावणी करून दोन चोरट्यांनी सोमवारी (ता. ३०) दुपारी आयएमआर महाविद्यालयाजवळ निवृत्त बीडीओ वसंत साळुंखे यांची सोन्याची चेन व अंगठी लंपास केली.

सरकारी पगारवर असलेले पोलिसदादा बंदोबस्त, वाळू व्यवसाय सेटलमेंट अन्‌ नसत्या भानगडींमध्ये व्यस्त असल्याने तोतया पोलिसांनी त्यांचा ‘चार्ज’ घेतला असल्याचे या घटनेवरून समोर आलेय. (Real police disappeared fake police took charge Pickpockets in buses railway stations and fake police on streets Jalgaon News)

Crime News
Sangli News : सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बुडवला ८४ कोटी ७८ लाखांचा कर; गुन्हा दाखल

असा घडला प्रकार

गणेश कॉलनीतील वसंत साळुंखे दुचाकीची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी आयएमआर महाविद्यालयाजवळील बॅटरी रिचार्ज सेंटरवर आले होते. तेथून परतताना त्यांना रस्त्यात अडवून अज्ञात व्यक्तीने त्यांना ‘एलसीबीचा पोलिस आहे, शहरात खूप चोऱ्या होत असून, दागिने सांभाळा’, असे म्हणाला. तेवढ्यात त्याचा साथीदार दुचाकीवरून आला व त्याने जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडील दागिने रुमालात ठेवले आणि वसंत साळुंखे यांनाही अंगठी व चेन आमच्याकडे द्या, असे सांगितले.

साळुंखे यांनीही अंगठी व चेन काढून त्या रूमालामध्ये ठेवली. नंतर त्या दोघांनी रूमाल गुंडाळून साळुंखे यांना देऊन तेथून धूम ठोकली. काही मिनिटांनी साळुंखे यांनी रूमाल उघडून पाहिल्यानंतर त्यात दगड मिळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सायंकाळी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Crime News
Market Committee News : बाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांना उभे राहाता येणार

पाचोऱ्यात पळवल्या वृद्धाच्या अंगठ्या

पाचोऱ्यातील साने कॉलनीतील निवृत्त भिवराव पाटील (वय ७९) सोमवारी (ता. ३०) दुपारी स्कूटीने गेले होते. दत्त कॉलनीतून जाताना विनानंबर प्लेट दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत भिवराव पाटिल यांच्या हातातून दोन अंगठ्या हिसकावून पळ काढला. पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

धरणगावातही वृद्धास लूटले

छगन सखाराम खैरनार (वय ७३, रा. कमलनगर, एरंडोल मार्ग, धरणगाव) १७ जानेवारीस सकाळी दहाच्या सुमारास वीजबिल भरण्यासाठी स्कूटीवरून बालाजी पतपेढीत आले होते. घरी जात असताना, किकाभाई बोहरा यांच्या बंगल्यासमोर दोन अनोखी दुचाकीस्वारांनी त्यांची दुचाकी थांबवली व ‘आम्ही पोलिस आहोत’, अशी बतावणी केली.

‘तुम्ही गांजा स्मग्लिंग करत आहे का’, असे म्हणत दोघी भामट्यांनी खैरनार यांच्या दुचाकीच्या डीक्कीची झडती घेतली. नंतर तुमच्या हातातील अंगठ्या रुमालमध्ये गुंडाळून खिशात ठेवा, असे म्हणत दरडवल्याने घाबरून खैरनार यांनी अंगठी काढून खिशात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, हातचलाखीने भामट्यांनी अंगठी लंपास केली. धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Crime News
Market Committee News : बाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांना उभे राहाता येणार

पोलिस व्हेरी बिझी..!

अवैध धंदेवाईकांकडून वसुली, वाळूच्या वाहनांची एस्कॉटींग आणि पकडेल्या वाळू वाहनांची पोलिस ठाण्यात अदलाबदल करण्यात सध्या गुन्हेशाखा व डीबी पथके व्यस्त आहेत. उरले-सुरले पोलिस २५ जानेवारीपासून गोद्री (ता. जामनेर) येथे कुंभ बंदोबस्ताला आहेत. झेड प्लस सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस अधिकारीही व्यस्त आहे. याची खडान्‌खडा माहिती असलेल्या भामट्यांनी संधीचे सोने करून घेण्याच्या निर्धाराने काम फत्ते केले. खरे पोलिस व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत सलग चोऱ्या घरफोड्यांसह भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत.

११२ तुमच्या मदतीला

वयोवृद्धांना लक्ष करून, इराणी व काही परजिल्‍ह्यातील टोळ्या ठराविक काळात सलग गुन्हे करून पसार होण्यात तरबेज आहेत. पोलिस व्यस्त असल्याने आपल्या मालमत्तेची व जिवाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःची आहे. महिला-वयोवृद्ध नागरिकांनी असा प्रसंग घडल्यास तत्काळ ११२ या क्रमांकावर‎ पोलिस नियंत्रण कक्षाला संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Crime News
Nashik News : इगतपुरी नगर परिषदेत अग्निशमन दलाची पदे रिक्त! 10 वर्षांपासून भरती नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com