Nandurbar News : गुटख्यासह नायलॉन मांजा LCBच्या छाप्यात जप्त

 LCB action
LCB actionesakal

आमलाड : तळोदा शहरातील अक्कलकुवा रोडलगत असलेल्या लतीफ किराणा दुकानातून प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.

तसेच शहरात एके ठिकाणी नायलॉन मांजा विक्रीच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला व तेथून साडेतीन हजारांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांवर तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तळोदा शहरातील अक्कलकुवा रोडलगत लतीफ किराणा दुकान आहे. तेथे प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तेथे धाड टाकली.(Nylon Manja with Gutkha Seized in LCB Raid Nandurbar News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

 LCB action
SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!

त्यात त्यांना केसरयुक्त विमल पानमसाला, मिराज स्वदेशी टोपको, झटपट पानमसाला, प्रतिभा सुगंधी तंबाखू आदींच्या पुड्या आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. त्यांची एकूण किंमत २८ हजार रुपये होते.

या संदर्भात किराणा दुकानावरील शाहीद अ. मस्जीद अन्सारी (वय ४६) याच्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस नाईक विशाल नागरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सहाय्यक निरीक्षक प्रिया वसावे तपास करीत आहेत. तसेच याच पथकाने शहरातील आंबेडकर चौक भागात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे कळाल्याने छापा टाकला.

त्यात तीन हजार आठशे रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात नायलॉन मांजा व ४० बॉबिन (खराडी) यांचा समावेश आहे. या संदर्भात पोलिस नाईक सुनील पाडवी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अल्ताफ अजित अन्सारी (रा. आंबेडकर चौक) याच्याविरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकात बापू बागूल, सुनील पाडवी व विशाल नागरे यांचा समावेश होता.

 LCB action
Crime News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात दिले फेकून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com