R.K. Yadav
R.K. Yadavesakal

Jalgaon News : रेल्वे गाड्यांचा विभागीय वेग; 130 किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढविणार

Jalgaon News : मध्य रेल्वेतील विभागीय रेल्वे गाड्यांचा विभागीय वेग १३० किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढविण्यावर भर असेल, अधिकाऱ्या‍कडून फील्ड सुरक्षा तपासणीवर भर दिला जाईल, सार्वजनिक मागण्या आणि प्रवाशांच्या सुविधा, रेल्वेतील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यावर आपला भर राहील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. यादव (राम करण यादव) यांनी दिली.(regional speed of railway trains will be increased to 130 km per hour jalgaon News)

राम यादव यांनी मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. यादव भुसावळला ‘डीआरएम’पदी कार्यरत होते.

यादव यांनी कामाच्या पहिल्या दिवशी मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर विभागातील सर्व प्रमुख विभागप्रमुख आणि सर्व डीआरएमच्या बैठका घेतल्या.

त्यांनी उपनगरीय लोकल आणि मेल एक्स्प्रेसच्या मुंबई विभागाच्या ट्रेन ऑपरेशनसाठी नियंत्रण कार्यालयाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील उपनगरीय मोटरमन आणि गार्ड लॉबीलाही भेट दिली.

ते म्हणाले, की विभागीय वेग १३० किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढविण्यावर भर असेल. ट्रेन आणि स्टेशन्समधील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यावर उपाययोजना करू, ट्रेन ऑपरेशन सुरक्षा, ट्रॅक, सिग्नलिंग, ओएचई ओव्हरहेड वायर उपकरणे यांच्या देखभालीची कामे, मालवाहतुकीचे लक्ष असेल. प्रमुख मार्गांच्या स्थापनेच्या प्रस्तावांचाही त्यांनी आढावा घेतला.

R.K. Yadav
Jalgaon News: अतिवृष्टी झालेल्या मंडळाची नावेही दुष्काळसदृश्य यादीत; आमदार पाटील यांनी मागितला शासनाकडे न्याय

काम करताना सचोटीने काम करू, नियमित आणि सणासुदीच्या विशेष गाड्या चालविणे आणि त्या गर्दीचे व्यवस्थापन योग्यरितीने करू. कर्मचारी कल्याण आणि पदोन्नती, कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय आरोग्य सुविधांवर भर असेल.

यादव १९८६ च्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्सचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, पुणे येथे महासंचालक म्हणून कार्यरत होते. मार्च १९८८ मध्ये ते रेल्वेमध्ये रुजू झाले.

त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करण्याचा खूप समृद्ध, विपुल अनुभव आहे. पश्चिम रेल्वे, उत्तर-पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे, आयआरआयसीईएन पुणे, आरआयटीईएस आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर त्यांनी विविध पदांवर, तसेच मुख्यालयांमध्ये काम केले आहे.

R.K. Yadav
Jalgaon News : दूध संघाला सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न : मंगेश चव्हाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com