

Jalgaon News : येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आखाडा तापल्यानंतर बोदवड उपबाजार समितीच्या विभाजनाबाबत पणन सचिवांनी आदेश काढल्याने निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे होती तर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात निवडणुकीला स्थगिती मिळण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. (rejection of petition paved way for election of Bhusawal market Committee jalgaon news)
या याचिकेवर गुरुवारी (ता. २०) सुनावणी होऊन याचिका फेटाळण्यात आल्याने भुसावळ बाजार समितीची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पणन विभागाच्या सचिवांनी ६ एप्रिलला राज्य निवडणूक सहकार प्राधिकरणाला बोदवड उपबाजार समितीचे मुक्ताईनगरातून विभाजन ती भुसावळ बाजार समितीला ती संलग्न करण्याबाबत पत्र दिले होते.
त्यामुळे मुक्ताईनगरसह भुसावळ बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती. मात्र त्या संदर्भात माघारीच्या दिवसापर्यंत आदेश निघाले नसल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शेलवड ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी व शेमळदे (ता. मुक्ताईनगर) येथील विकासो सदस्य संजय पाटील यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल करीत निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
निवडणूक झाली तरी निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी कमी असणार असल्याचा मुद्दा याचिकेद्वारे मांडण्यात आला होता. मात्र गुरुवारी सुनावणीअंती खंडपीठाने ही याचिका फेटाळल्याची माहिती आहे.
दरम्यान, गुरुवारी (ता. २०) माघारीचा अंतिम दिवस असल्याने बाजार समितीतील चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात असून, आमदार एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी व आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलमध्ये सरळसरळ लढत होणार असल्याने या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.