Jalgaon News : अमळनेरला रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

Road Construction News
Road Construction Newsesakal

अमळनेर : येथील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांना अनेक वर्षांपासून अपेक्षित पक्का रस्ता आणि रस्त्यातील अडथळे दूर झाल्याने दुहेरी समस्या सुटली आहे.

अमलेश्वरनगर, शाहआलमनगर ते रामेश्वरनगर, श्रीराम कॉलनी कच्चा रस्ता आणि त्यातही भर रस्त्यात विजेचे खांब आणि तारा असल्यामुळे नागरिकांना आणि वाहनांना जा-ये करण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. (Residents of Ward No. 17 have been waiting for many years for paved road removal of road obstructions has solved dual problem Jalgaon News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Road Construction News
Nashik Crime News : सिडकोत गुन्हेगारीचा वाढता आलेख! वाढत्या घटनांमुळे नागरिक असुरक्षित

अमळनेर प्रभाग १७ मधील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वासमोठी वाहने जाऊ शकत नव्हती. महावितरण आणि नगरपालिका अशा दोन संस्थांशी संबंध येत असल्याने समस्या सुटत नव्हती.

हे विद्युत सयंत्र व विद्युत रोहीत्र स्थलांतरित करण्यासाठी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी महावितरण कंपनी व नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे अमळनेर नगरपालिकेने १.३ योजनेंतर्गत अमलेश्वरनगर, शाहआलमनगर ते रामेश्वरनगर श्रीराम कॉलनी या रस्त्यावरील नागरिकांना व रहदारीला अडथळा असलेले विद्युत रोहित्र व संयंत्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्याने रस्त्याच्या व नागरिकांच्या रहदारीचा अडथळा कायमस्वरूपी नष्ट झाल्याने नागरिकांची चिंता मिटली. रस्ताही काँक्रिटीकरण करण्यात आल्याने वाहतुकीची समस्या सुटली आहे.

Road Construction News
Jalgaon Municipal Corporation : ‘अमृत’ मध्ये समाविष्टासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com