esakal | चांगल्या पावसाचा परिणाम : गिरणा धरण ६८.४२ टक्के भरले
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon

चांगल्या पावसाचा परिणाम : गिरणा धरण ६८.४२ टक्के भरले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात पावसाने (Rain) आतापर्यंत लावलेल्या दमदार हजेरीने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात (irrigation project) ७९.४० टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. वाघूरसह अन्य मध्यम ८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गिरणा प्रकल्पात ६८.४२ टक्के साठा आहे.

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर परतीच्या प्रवासाला सुरवात होते. मात्र, अजूनही जिल्ह्यात काही दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचा आहे. सुरवातीला हवामान विभागाने सरासरीनुसार अंदाज वर्तविला होता. जून पर्जन्यमान होणार असल्याचा जुलैच्या सुरवातीला मान्सूनने तब्बल १५ ते २० दिवसांचा खंड दिला. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सरासरी पर्जन्यमानानुसार जून ते सप्टेंबरदरम्यान आतापर्यंत १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक चांगली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पापैकी हतनूर प्रकल्पात गेल्या २४ तासांत ५५.२१ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली.

हेही वाचा: अंजनी प्रकल्पात 80 टक्के जलसाठा..सिंचनाची समस्या दूर

हतनूर प्रकल्पात ८०.५९ टक्के, तर गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ९ मिलिमीटर पावसासह ३.१३ दशली घनमीटर पाण्याची आवक झाली असून, प्रकल्पात ६८.४२ टक्के साठा आहे. वाघूर प्रकल्पासह अभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा, अग्नावती, तोंडापूर, बोरी आणि मन्याड आदी ९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. मोर ९२.७४, बहुळा ९९.८, अंजनी ८७.५६, गुळ ४७.९७, तर सर्वांत कमी भोकरबारीत १६.८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

loading image
go to top