Jalgaon News: पोलिसपाटील परिक्षेचा निकाल 7 तासातच! कोतवालपदाचा निकालही 4 तासात

District Collector Ayush Prasad and the team of Revenue Department who successfully conducted the police Patil and Kotwal exam and announced the results within a few hours.
District Collector Ayush Prasad and the team of Revenue Department who successfully conducted the police Patil and Kotwal exam and announced the results within a few hours.esakal
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात आज झालेल्या पोलिस पाटील पदासाठीच्या लेखी परीक्षेचा निकाल अवघ्या साडेसात तासातच जाहीर करण्यात आला.

तत्पूर्वी कोतवाल परीक्षेचा निकालही केवळ चार तासातच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ऑनलाइन जाहीर करून उमेदवारांना सुखद धक्का दिला आहे. परीक्षेनंतर काही तासात निकाल जाहीर करणारे पहिले जिल्हाधिकारी ठरले आहेत. (Result of Police Patil exam in 7 hours Kotwal post result also in 4 hours Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

District Collector Ayush Prasad and the team of Revenue Department who successfully conducted the police Patil and Kotwal exam and announced the results within a few hours.
Success Story : घरची जबाबदारी, संसार-मुलं सांभाळत तब्बल 18 वर्षांनंतर सविता शिंदेंचं 'वर्दी'चं स्वप्न झालं पूर्ण!

कोतवाल व पोलिस पाटील पदासाठी आज सकाळी व दुपारी शहरात आठ केंद्रावर परीक्षा झाल्या होत्या. उत्तरपत्रिका स्कॅन करून निकाल जाहीर करण्यात आला.

काही उत्तरपत्रिकांची मॅन्युअली तपासणी झाली, जेणे करून चूक विरहित निकाल लागला पाहिजे याची दक्षता घेण्यात आली. एका प्रश्नावर हरकत आली होती, त्यावर उत्तर काढण्यात आले.

प्रश्नपत्रिका गोपनीय ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. संबंधित अधिकाऱ्यांनाही गोपनीय ठिकाणी थांबविले होते. सर्व परीक्षा गोपनीय ठिकाणी, पोलिस बंदोबस्तात झाली. उत्तरपत्रिका तपासून ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यावर अधिकाऱ्यांना गोपनीय ठिकाणावरून बाहेर सोडण्यात आले.

District Collector Ayush Prasad and the team of Revenue Department who successfully conducted the police Patil and Kotwal exam and announced the results within a few hours.
Nandurbar News: दुर्गम गावातील शेतकऱ्याचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com