नवरात्रोत्सवापूर्वीच चोरट्यांची दिवाळी; निवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडले!

robbery
robbery esakal

जळगाव : पुण्यात मुलाकडे गेलेल्या निवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ६७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी दुपारी तीनला शनिपेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.(retired principal house burglary by thieves at navratri season jalgaon crime latest news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण गरबड चौधरी (वय ६९, रा. जुना खेडी रोड, सदाशिवनगर) पत्नीसह वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा पुण्यात नोकरीनिमित्त राहतो. चौधरी दांपत्य घराला कुलूप लावून १० ऑगस्टला पुण्याला मुलाकडे गेले होते.

गेल्या दीड महिन्यापासून घर बंदच होते. चोरट्यांनी रेकी करून १० ऑगस्ट ते २४ सप्टेंबरदरम्यान बंद घराच्या दरवाजाचे सेंटर लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने नेले. हा प्रकार चौधरी यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आला.

robbery
Jalgaon : तरसोद फाट्यावर ट्रकची दुचाकीला धडक

त्यांनी नारायण चौधरी यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. चौधरी दांपत्य घरी परतल्यावर सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी दुपारी तीनला शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन तपास करीत आहेत.

robbery
Jalgaon : क्रॉसकम्प्लेंटचा धाक दाखवुन पोलिसांनी केली मांडवाली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com