Jalgaon News : 3 जागा शासनाने घेतल्या ताब्यात; महसूल विभागाची कारवाई

Revenue-Department Work News
Revenue-Department Work Newsesakal

जळगाव : येथील शाहू नगरातील ट्राफीक गार्डन परिसरातील तीन जागा मंगळवारी (ता. १४) महसूल विभागाने एकतर्फी ताब्यात घेतल्या. ही जागा पूर्वीपासूनच शासनाची होती. त्यावर काही जणांनी कब्जा दाखविला होता.

त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. ( revenue department seized 3 places of government in traffic garden area of ​​Shahu Nagar jalgaon news)

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तहसीलदारांना सीटीआय क्रमांक ९१७८, ९१७९, ९१८० या जागा शासन जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस बंदोबस्तात ही जागा ताब्यात घेण्यात आली. यावेळी कब्जा असलेल्या व इतर नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस बंदोबस्त असल्याने कोणी या जागेवर हक्क सांगितला नाही.

तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, मंडळाधिकारी राजेश भंगाळे, तलाठी संदीप डोभाळ आदींनी जागेचे मोजमाप करून ती जागा शासन जमा केली आहे. वरील सिटी सर्व्हे क्रमांकांवर काही जणांनी आपला कब्जा दाखविला होता.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Revenue-Department Work News
Jalgaon News : 17 मजलीत होतेय भंगाराचे गोदाम; मनपाच्या जागांची मुक्त उधळण

त्यावर सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी मित्तल यांनी संबंधित मालमत्ता शासनाचे असल्याचे सांगितले होते. यामुळे त्या जागा ताब्यात घेऊन त्यावर शासकीय नाव लावावे असे आदेश होते. त्यानुसार आज साडेअकरा पावणेबाराच्या सुमारास वरील अधिकारी पोलिस बंदोबस्तासह गेले.

जागा मोजमाप करायला लागल्याने कब्जा सांगणारे व इतरांनी गोंधळ करण्यास सुरवात केली. मात्र, पोलिसांनी त्यांना ताकीद देताच गोंधळ थांबला. जागेचे मोजमाप होईपर्यंत नागरिकांची गर्दी कायम होती.

Revenue-Department Work News
Msedcl Go Green : ‘गो-ग्रीन’मधून 20 लाखांची वार्षिक बचत; वीज ग्राहकांना सवलत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com