Crime Update : किरकोळ वादातून रिक्षाचालकावर वार | Latest marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime News

Crime Update : किरकोळ वादातून रिक्षाचालकावर वार

जळगाव : किरकोळ कारणावरून वाद उकरून काढत पाच जणांनी रिक्षाचालकास जबर मारहाण (Beating) केली. रेल्वेस्थानक परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी मोनल विजय रतवेकर (वय २७) हा रिक्षाचालक आहे. (rickshaw driver was stabbed due to minor dispute jalgaon Latest Marathi News)

हेही वाचा: डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे पुन्हा कोविड सेंटरमध्ये रूपांतर

गुरूवारी (ता. २१) पहाटे साडेतीनच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी रिक्षा लावून उभा असताना मोनलला एहसान अली हैदर अली याने जवळ येऊन माझ्याकडे का बघतो असे सांगून मारहाण केली.

त्याच्यासोबत असलेल्या हैदर अली बालम अली, शेरखान बालम अली, अरबाज शेख (सर्व रा. उस्मानिया पार्क) आणि एक अनोळखी अशा पाच जणांनीही बेदम मारहाण सुरु केली. अरबाज शेख याने हातातील लोखंडी कैची घेऊन मोनलच्या डोक्यावर तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने मारहाण केली.

यात मोनल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

हेही वाचा: महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती

Web Title: Rickshaw Driver Was Stabbed Due To Minor Dispute Jalgaon Latest Crime Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top