
Jalgaon Crime News : तरुणाच्या आत्महत्येतून दंगल
जळगाव : गेल्या आठवड्यात जाखनीनगर कंजरवाड्यातील तरुण रितेश माचरे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी रविवारी (ता. २७) दोन्ही कुटुंबातील नातेवाईक समोरासमोर येऊन घमासान हाणामारी झाली. यात घराबाहेर उभी कार फोडली असून, चार घरांवर हल्ला करून नुकसान करण्यात आले.
सावन गागडे शनिवारी (ता. २६) दुपारी दीडला घराशेजारील दुकानाजवळ नातेवाईक सूर्यभान अभंगे, श्याम गारुंगे यांच्यासह बसले होते. शशिकांत बागडे तेथे आला. शिवीगाळ करून तो गागडे यांचे मोबाईलमध्ये फोटो काढू लागला. गागडे यांनी त्यास कशाला फोटो काढतो आहे, असे बोलले.
याचा राग आल्याने त्याने जयेश माचरे, कार्तिक बाटुंगे, राहुल माचरे, आकाश माचरे, कपिल बागडे, अर्जुन माचरे, नीलेश माचरे, रोहित माचरे, श्रद्धा माचरे, दीपमाला बाटुंगे, दिशा भाट, तमन्ना माचरे, रत्नाबाई बागडे, ऋतिक बागडे यांना बोलवून घेतले. (Riots from youth Suicide Jalgaon Crime News)
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
हेही वाचा: District Milk Union : लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट
सर्वांनी गागडे यांना शिवीगाळ केली. नंतर शशिकांत व जयेश याने लाकडी दांडक्याने घराबाहेर उभी असलेली कारच्या (एमएच ३१, डीसी २७००) काच फोडून नुकसान केले. नंतर गागडे यांच्यासह त्यांचे दोन नातेवाइकांच्या घरांमध्ये प्रवेश करून सर्वांनी सामानाची तोडफोड केली. यात गागडे यांच्यासह त्यांच्या पत्नी सिंधीबाई, सून वंदना, मुलगी करूणा व भाऊ प्रताप यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नाही तर सोडणार नाही
श्रद्धा माचेकर यांच्या घरासमोर सावन गागडे, विकास गागडे, आनंद गागडे, राजू गागडे, शशी गागडे, करूण भाट बसले होते. श्रद्धा यांचे पती जयेश माचरे रुग्णालयातून घरी आले. सावन गागडे याने आमच्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घ्या, नाही तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी जयेश यांना देऊन त्यांच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर विकास व राजू गागडे यांनी श्रद्धा यांना मारहाण केली, तर इतर सर्वांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सामानाची तोडफोड केली. याबाबत श्रद्धा माचरे यांच्या फिर्यादीवरून ६ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
नेमके काय आहे प्रकरण
रितेश दिलीप माचरे (वय २२) याने २० नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विवाहितेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार मृत रितेश याच्या कुटुंबीयांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून दोन्ही कुटुंबांत वाद विकोपाला जाऊन रविवारी घमासान हाणामारी झाली.
हेही वाचा: Jalgaon Crime News : कासोद्यात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण