गणेशोत्सवात ‘Corona’ संसर्गाचा धोका; आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona news

गणेशोत्सवात ‘Corona’ संसर्गाचा धोका; आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा

जळगाव : येत्या बुधवारपासून (ता. ३१) गणेशोत्सव सुरू होत आहे. दोन वर्षानंतरचा गणेशोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होणार आहे. गर्दीद्वारे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अनेकांना संसर्ग होवू शकतो, यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करून स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डीन डॉ. किशोर इंगोले यांनी दिली. (Risk of Corona infection in Ganeshotsav 2022 Alert alert of health department jalgaon Latest Marathi News)

सध्या कोरोनाच्या शंभर ते सव्वाशे चाचण्या दररोज होत आहे. त्यातीन दोन-तीन रूग्ण रोज पॉझिटिव्ह येत आहे. मात्र त्यांना ऑक्सिजनची गरज नाही. रुग्णालयात दाखल होऊन दोन-तीन दिवसात ते उपचार घेऊन बरे होत आहेत. पुणे, मुंबईत रुग्ण वाढत आहेत. काहीजण पुणे, मुंबईत गणेश फेस्टिव्हल पाहण्यासाठी जातील. जर नागरिक बाधितांच्या संपर्कात आले तरी त्यांना बाधा होवू शकते. यामुळे बाहेरगावी जातानाही मास्क घालणे गरजेचे आहे.

हेही वाचा: MVP Election : निफाड, दिंडोरी, कसमादेने सोडली ‘प्रगती’ची साथ

बेफिकीरपणा नको

‘कोरोना गेला आता काय मास्क घालायचा, अशी मनोवृत्ती योग्य नाही. इम्युनिटी पॉवर चांगली असेल तर कोणताही आजार होत नाही. मात्र इम्युनिटी पावर कमकुवत असेल तर साध्या आजाराचा रुग्ण जरी शेजारी असला तर त्याचा संसर्ग आपल्याला होवू शकतो. यामुळे मास्क घालणे, गर्दीत जाणे टाळणे ही काळाची गरज आहे.

ॲंटीजन चाचण्या झाल्या कमी

राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी झाली. दुसरीकडे आरोग्य विभागाने अँटीजन, कोरोना टेस्टिंग चाचण्यांची संख्या कमी केली आहे. चाचण्या कमी झाल्याने रुग्ण संख्या बाहेर येत नाही, मात्र याचा उद्रेक केव्हा होईल हे सांगता येत नाही, असे खासगी डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik : शहरभर ट्रॅफिक जाम

Web Title: Risk Of Corona Infection In Ganeshotsav 2022 Alert Alert Of Health Department Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..