Jalgaon : अतिक्रमणामुळे बंद असलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला

Encrochment
Encrochmentesakal

अमळनेर : अनेक दिवसांपासून किरकोळ अतिक्रमणामुळे बंद असलेला रस्ता पालिकेने मोकळा करून वाहतुकीसाठी सुरळीत केल्याने आठ ते दहा कॉलनीच्या नागरिकांची सोय झाली आहे.

धुळे रोडलगत असलेल्या शेतकी संघ जीन व गोसावी जीन यांच्या दरम्यान असलेला रस्ता किरकोळ अतिक्रमणामुळे वाहतुकीस बंद होता. रस्त्यात असलेले पत्र्याचे शेड, तीन शौचालय यामुळे रस्ता बनवता येत नव्हता.(Road closed due to encroachment open for traffic Jalgaon News)

Encrochment
Water Supply Problem : पाणीपुरवठा मंत्र्यांचा मतदारसंघात पाणी पेटले

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बांधकाम अभियंता अमोल भामरे, दिगंबर वाघ, मिलिंद चौधरी, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी जेसीबी लावून रस्त्यातील सर्व किरकोळ अतिक्रमणे काढून टाकल्याने रस्ता मोकळा झाला.

आणि काही तासांत नगरपरिषदेने दगड मुरूम टाकून रोलिंग करून रस्ता तयार करून दिला. या भागातील क्रांतीनगर, दौलतराव पार्क, विद्यानगर, राधाकृष्ण नगर, सानेगुरुजी पतपेढी यासह आठ ते दहा कॉलनीवासीयांची सोय झाली आहे. त्याचप्रमाणे पिंपळे रस्त्याकडून धुळे रोडला जोडणारा वळणदार रस्ता देखील सरळ करण्यात येणार आहे. नगरपरिषदेने तत्काळ सुविधा केल्याने नागरिकांनी आभार मानले आहेत.

Encrochment
अमृत टप्पा क्रमांक 2.0 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण DPR तयार करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com