जळगाव : पदाधिकाऱ्यांचे प्रभाग चकाचक अन् इतर भागात खड्डेमय रस्ते

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationsakal

जळगाव : महापौर, उपमहापौर, सत्ताधारी गटाचा नेता, स्थायी समिती सभापती हे सर्व पद शहराचे आहेत. त्यामुळे त्यांनी संपूर्ण शहरातील प्रभागाचा विचार करावा, अशी अपेक्षा असते. मात्र पदाधिकाऱ्यांचे प्रभाग चकाचक आहेत, परंतु इतर भागात मात्र खड्डेमय रस्ते आहेत. त्याबाबत लक्ष का दिले जात नाही ? असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. विरोधी नगरसेवकही आता त्याबाबत आवाज उठवीत आहेत.

जळगाव शहरात आज सर्वात जास्त रस्त्याची समस्या आहे. रस्त्यासाठी कोटीच्या कोटी रुपयांचे नियोजन केल्याचे सांगण्यात येत मात्र प्रत्यक्षात शहरातील बहुतांश भागात आजही लोकांना खड्ड्याच्या रस्त्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्तेही चांगले नाहीत त्यामुळे आजही जळगावकर ‘कोटीं’चे चांगले रस्ते होणार याच प्रतिक्षेत आहेत. परंतु दुसरीकडे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातील चित्र मात्र वेगळेच आहे, शहरातील इतर भागातील मुख्य रस्ते चांगले कधी होणार याची प्रतिक्षा असताना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातील गल्ली बोळातील रस्तेही चकाचक दिसत आहे, अगदी या रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण झालेले दिसत आहे.

Jalgaon Municipal Corporation
बहिणीच्या लग्नातच भावावर काळाचा घाला; कुटूंबावर दुःखाचा डोंगर

या नेत्यांचे प्रभाग चकाचक

महापालिकेत महापौर, उपमहापौर, सत्ताधारी शिवसेना गटनेते, शिवसेना महानगरप्रमुख या सत्ताधारी गटाच्या नेत्यांच्या प्रभागात पाहिल्यास यांच्या भागात अगदी गल्लीबोळीतील रस्तेही चांगले आहेत. महापौर जयश्री महाजन मेहरूण भागातील प्रभाग पाहिल्यास या ठिकाणी अगदी लहान रस्तेही सिमेंटचे झाले आहेत. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मयूर कॉलनी भागातील रस्त्याची कामेही करून घेतली आहेत. शिवसेना गटाचे महापालिकेतील नेते नितीन लढ्ढा यांच्या प्रभागातील गल्लीबोळातील रस्त्याचे कामे सुरू आहेत. शिवसेना शहरप्रमुख शरद तायडे यांच्या गल्लीतही काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागात काम करून ते ‘आदर्श’ केले आहेत.

इतर प्रभागाकडेही लक्ष द्यावे

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आपण ज्या प्रभागातून निवडून येतो, त्या प्रभागातील जनतेसाठी विकासाची कामे केलीच पाहिजे, ही अत्यंत चांगली बाब आहे. त्यामुळे त्या भागातील जनतेला सुविधाही मिळतील. परंतु त्यांचे पद हे संपूर्ण शहरासाठी असते, त्यामुळे त्यांनी शहराच्या प्रत्येक प्रभागाकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे ते आपल्या प्रभागाकडे लक्ष देतात त्याच प्रमाणे त्यांनी इतर प्रभागाकडे लक्ष देवून काम करून घेण्याची गरज आहे. अगदी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलवून त्यांच्या प्रभागातील कामे सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. पदाधिकारी कोणत्याही एका प्रभागाचे नसतात ते सर्व शहराचे असतात, अशी विरोधी पक्षातील नगरसेवकांचीही अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याच प्रभागाप्रमाणे इतर प्रभागातील रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिल्यास शहराचे रूप निश्‍चित बदलले.

Jalgaon Municipal Corporation
खडसेंनी डागली तोफ, गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा...

''महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व सत्ताधारी गटनेतेपद हे केवळ एका पक्षाचे पद नसते, ते संपूर्ण शहराचे असते, त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शहराच्या प्रभागातील कामांचा विचार करून ते पूर्ण होत आहेत, की नाही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे सर्व भागातील लोकांना विकासाचा लाभ होईल.'' - जितेंद्र मराठे, नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com