हुश्‍श...जळगावातील रस्त्यांसाठी

अखेर ४२ कोटींचा निधी मंजूर; नगरविकासमंत्री शिंदे, नगरोत्थान अभियानांतर्गत प्रकल्प
Road construction
Road constructionsakal

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर देऊन दर्जेदार कामे करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत आढावा घेतला. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांचेसह दूरदृश्य प्रणालीद्वारे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपा राऊळ आदी उपस्थित होते.

Road construction
पाककडून 'हिट लिस्ट'वरच्या न्यूझीलंडचाही खेळ खल्लास!

पालकमंत्री सुचवतील कामे

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत असून मुख्य रस्त्यांची कामे तातडीने सुरू करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. शहरातील रस्त्यांची कामे सुचविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

या समितीत जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांचा समावेश असेल. रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार असून रस्त्यांची कामे करताना ती दर्जेदार करण्यावर भर देण्याचे निर्देशही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

५८ कोटींसाठी मागणीचा प्रस्ताव द्या

मंजूर ४२ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर १०० कोटी रुपयांच्या निधीपैकी उर्वरित ५८ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी त्यांनी शिंदे यांच्याकडे केली असता मनपाने निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ नगरविकास विभागाकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी नगरविकासमंत्र्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com